आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फर्स्ट लूक आऊट:सैयामी खेरसोबत रोमान्स करताना दिसणार अभिषेक बच्चन, आगामी ‘घूमर’ चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चित्रपटात सैयामी एका क्रिकेटरच्या भूमिकेत दिसणार आहे.

दसवी या चित्रपटाला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादानंतर आता अभिषेक बच्चन त्याच्या नवीन चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. ‘घूमर’ हे त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव असून त्याचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात अभिषेकसोबत सैयामी खेर दिसणार आहे. सैयामीने अपने सोशल मीडिया अकाउंटवर चित्रपटाचे फर्स्ट लूक शेअर केले आहे.

या चित्रपटात अभिषेक सैयामीसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. चित्रपटाचे पोस्टर शेअर करत सैयामीने लिहिले...,‘मी ज्या लोकांना भेटले, त्यापैकी काही चांगल्या लोकांसोबतचा हा माझा प्रोजेक्ट आहे. मला जे आवडते, तेच मला या लोकांनी करू दिले. आतापर्यंतची सर्वात आव्हानात्मक भूमिका साकारण्याची मला त्यांनी संधी दिली. पुढेही मी अशीच भूमिका करणार."

चित्रपटात सैयामी एका क्रिकेटरच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिषेक तिच्या कोचच्या भूमिकेत झळकणार असल्याची चर्चा आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आर. बाल्की करणार आहेत. विशेष म्हणजे, सैयामी राज्य पातळीवर क्रिकेटर राहिली आहे.

बातम्या आणखी आहेत...