आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहर्षद मेहता प्रकरणाची प्रेरणा घेऊन ‘द बिग बुल’ची निर्मिती झाली. ही कहाणी एका मध्यमवर्गीय तरुणाची, ज्याला उद्योगपती व्हायचे आहे. कोणाची नोकरी करायची नाही, तर नोकरी देणारा व्हायचे. हर्षद मेहताने हे सगळे तीस वर्षांपूर्वी करायचा प्रयत्न केला. सध्या बेरोजगारीने घेरलेल्या तरुणांना व्यवस्थाही तुम्ही नोकरी देणारे व्हा, असे आव्हान करत आहे. यातील पात्र आणखी एका गोष्टीकडे बोट दाखवते. ते म्हणजे सगळ्यात मोठी शक्ती पैसा नाही. शक्तीचे केंद्र माहितीमध्ये सामावले आहे. ज्याच्याकडे अर्थविषय किंवा राजकीय जगतातील आतल्या बातम्या आहेत, तो सर्वशक्तिमान आहे.
हा चित्रपट तत्कालीन सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यातही उभा करतो. ‘द बिग बुल’ 90 च्या दशकाचा आहे. तेव्हा भारताचे आर्थिक पाऊल एका वेगळ्या बदलाचे होते. त्याच काळात चाळीत राहणारा नायक हेमंत शाह (अभिषेक बच्चन) तत्कालीन बॅंकिंग व्यवस्थेच्या त्रुटींचा फायदा घेत कसा शेअर मार्केटचा राजा होतो, हेच चित्रपट सांगतो. अभिषेक बच्चनची भूमिकेवर पकड आहे. ते आपण ‘गुरू’मध्ये पाहिले आहे. येथे हेमंत शहाचा विचार, निर्णय, अस्वस्थता, महत्त्वाकांक्षेला त्यांनी कडक शैलीत सादर केलेे. ‘गुरू’मध्ये गुरुकांत देसाईला त्यांनी आक्रमक आणि काही हद्दीपर्यंत आक्रस्ताळलेला ठेवले. पण, हेमंत शहाला त्यांनी वरवरचा शांत आणि संयमी ठेवले. हेमंतचा भाऊ झालेल्या सोहम शहानेही भूमिकेची छाप सोडली आहे. तो भूमिकेशी एकरूप झाला.
हेमंतच्या विरोधातील मन्नू भाईच्या भूमिकेत सौरभ शुक्ला आहे. सौरभ येथे ‘जॉली एलएलबी’मधील न्यायाधीश त्रिपाठीसारखी भूमिका वठवण्यात यशस्वी झाल्याचे दिसत नाहीत. पत्रकार मीरा रावची भूमिका साकारणारी इलियाना डिक्रूज, हेमंतच्या पत्नीच्या भूमिकेतील निकिता दत्ता आणि उर्वरित सहकलाकारांच्या भूमिका म्हणाव्या तशा लक्षात रहात नाहीत. कारण, या भूमिका ज्या राज्याशी जोडलेल्या आहेत तेथील भाषेचा पोत, वागणे इथे पाहायला मिळाले नाही. बहुतेक निर्मात्याला सर्व भारतीय प्रेक्षक डोळ्यांसमोर ठेवून हा सिनेमा बनवायचा असावा.
प्रसंगानुसार गाण्यांची भट्टी जमली. कैरी मिनाटीचे ‘द बिग बुल’ गाणे बरे आहे. कुंवर जुनेजाने लिहिलेले ‘इश्क नमाजा’ कानात घोळत राहते. चित्रपटभर 90 चे दशक आपल्या नजरेस पडते. दिग्दर्शक कुकी गुलाटी यांनी कथा आणि पटकथा अर्जुन धवनसोबत लिहिली आहे. संवाद लेखन रितेश शहा यांनी केले आहे. कुकी, अर्जुन आणि रितेश यांनी काही प्रश्न समोर ठेवायचाही प्रयत्न केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.