आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिषेकचे चोख उत्तर:यूजरने फोटो शेअर करुन लिहिले - जर अभिषेक 'बच्चन' नसता…,  ज्युनियर बच्चन म्हणाला - 'तरी पण मी तुझ्यापेक्षा चांगला दिसतो’

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यूजरने एक ट्विट करत अभिषेकला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनला अनेकदा सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. अलीकडेच एका यूजरने पुन्हा एकदा त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी अभिषेकने त्याला चोख उत्तर देत त्यालाच ट्रोल केले. झाले असे की, सोशल मीडियावर एका यूजरने एएनआयचा एका फोटो शेअर केला होता. हा फोटो एका शेतकऱ्याचा असल्याचे म्हटले जाते. फोटोमधील व्यक्ती ही अभिषेक बच्चनसारखी दिसत असल्याचे त्या यूजरने म्हटले. ''जर अभिषेक 'बच्चन' नसता तर'' या आशयाचे ट्विट करत अभिषेकला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.

अभिषेकचे उत्तर
अभिषेकने या यूजरला उत्तर दिले आहे. त्याने ‘हाहाहा खूप मजेशीर आहे. पण तरी पण मी तुझ्यापेक्षा चांगला दिसतो’ असे उत्तर अभिषेकने दिले.सध्या सोशल मीडियावर अभिषेकने दिलेल्या उत्तराची जोरदार चर्चा सुरु आहे.

अभिषेक 'लुडो'मध्ये दिसणार आहे

अभिषेक बच्चनचा पुढील चित्रपट अनुराग बासू दिग्दर्शित डार्क कॉमेडी 'लुडो' आहे, जो ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर 12 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. अभिषेकसह राजकुमार राव, आदित्य रॉय कपूर, फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा ​​आणि पंकज त्रिपाठी यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

बातम्या आणखी आहेत...