आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हॅपी बर्थडे ज्युनिअर बी:करिश्मासोबत मोडला होता अभिषेकचा साखरपुडा, 'रिफ्युजी'च्या सेटवर करीना म्हणायची जीजूस रोमँटिक सीन करण्यास दिला होता नकार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिषेकच्या आयुष्यात आले चढउतार

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा आज वाढदिवस असून त्याने वयाची 45 वर्षे पूर्ण केली आहेत. 5 फेब्रुवारी 1976 रोजी मुंबईत त्याचा जन्म झाला. ऐश्वर्यासोबत लग्नापूर्वी करिश्मा कपूरची एंट्री अभिषेकच्या आयुष्यात झाली होती. मात्र दोघांचे नाते लग्नापर्यंत पोहोचू शकले नव्हते. अभिषेक-करिश्माचे लग्न नेमक्या कोणत्या कारणामुळे होऊ शकले नाही, जाणून घेऊयात...

अभिषेकच्या आयुष्यात आले चढउतार
आज अभिषेक बच्चन माजी जगतसुंदरी ऐश्वर्याचा पती आहे. परंतु अभिषेकच्या आयुष्यात आलेली पहिली तरुणी ही करिश्मा कपूर होती. करिश्मा-अभिषेक बालपणापासून एकमेकांना ओळखत होते. परंतु प्रेमाची सुरुवात अभिषेकची बहीण श्वेताच्या लग्नानंतर झाली. श्वेताचे लग्न करिश्माच्या आत्याचा मुलगा निखिल नंदासोबत झाले आहे. लग्नादरम्यान दोघांची जवळीक वाढली होती. त्याचकाळात अभिषेकला 'रिफ्यूजी' हा पहिला सिनेमा मिळाला. या सिनेमात त्याच्या अपोझिट करिश्माची धाकटी बहीण करीना कपूर होती. असे म्हटले जाते, की करीना सेटवर अभिषेकला भावोजी म्हणून हाक मारायची. करिश्मा नेहमी अभिषेकला भेटायला सेटवर यायची. अभिषेकचा पहिला सिनेमा फ्लॉप ठरला, मात्र दोघांचे प्रेम फुलतच गेले.

जया बच्चन यांच्या एका अटीमुळे तुटले अभिषेक-करिश्माचे नाते
अमिताभ यांनी त्यांच्या 60 व्या वाढदिवशी अभिषेक-करिश्माच्या साखरपुड्याची घोषणा केली होती. त्यावेळी सर्वांना अभिषेक-करिश्माच्या प्रेमाविषयी समजले. परंतु दोघांच्या नात्याला कुणाची तरी नजर लागली. दोघांचा साखरपुडा झाला. अभिषेकसोबत लग्नानंतर करिश्माने सिनेसृष्टीत काम करु नये, अशी जया बच्चन यांनी तिला अट घातल्याचे वृत्त लगेचच आले. ही अट करिश्माची आई बबिता यांना मात्र मान्य नव्हती.

बबिता यांना पसंत नव्हता अभिषेक
करिश्माची आई बबीताला अभिषेक आवडत नव्हता. तरीदेखील करिश्माने त्याच्यासोबत साखरपुडा केला. त्याकाळी अभिषेकचे अनेक सिनेमे फ्लॉप होत होते. तर करिश्मा आघाडीची अभिनेत्री होती. बबीता यांना भिती वाटायची, की अभिषेक कधीच यशस्वी अभिनेता होऊ शकला नाही तर.. अखेर करिश्मा आई पुढे झुकली आणि तिने स्वत: हे नाते संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर कपूर आणि बच्चन कुटुंबात वाद झाल्याचेही म्हटले जाते.

दिल्लीच्या व्यावसायिकासोबत करिश्माने केले होते लग्न
अभिषेकसोबत लग्न मोडल्यानंतर काही महिन्यांतच करिश्माने घटस्फोटित संजय कपूरसोबत लग्न थाटले. पण करिश्मा आणि संजयचे नाते काही वर्षेच टिकले. दोघांचा घटस्फोट झाला आहे. संजय कपूरने आरोप लावला होता, की करिश्माने पैशांसाठी अभिषेक बच्चनशी लग्न मोडून माझ्याशी लग्न केले होते. आता संजय कपूरने प्रिया चटवालसोबत तिसरे लग्न झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...