आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नानावटी रुग्णालयातून आनंदाची बातमी:अभिषेक बच्चन कोरोनामुक्त, 28 दिवसांनंतर निगेटिव्ह आला रिपोर्ट, ट्विटरवर लिहिले - मी म्हणालो होतो की, मी कोरोनाला हरवणार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिषेक बच्चन हा वडील अमिताभ बच्चन यांच्यासोबत 11 जुलैला नानावटी रुग्णालयात दाखल झाला होता
  • 2 ऑगस्टला अमिताभ बच्चन यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता, 22 दिवस राहिले होते रुग्णालयात

नानावटी रुग्णालयात दाखल असलेल्या अभिषेक बच्चनचा लेटेस्ट कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. ज्यूनिअर बच्चनने ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले की, 'प्रॉमिस हे प्रॉमिस असते. आज दुपारी माझी कोविड-19 टेस्ट निगेटिव्ह आली. मी तुम्हाला म्हणालो होतो ना की, मी याला हरवेल. माझ्या आणि माझ्या कुटुंबासाठी तुम्ही प्रार्थना केली याचे खूप आभार. नानावटी रुग्णालयातील डॉक्टर्स आणि नर्सिंग स्टाफचे खूप खूप धन्यवाद'

28 दिवसांनंतर निगेटिव्ह आला रिपोर्ट
अभिषेक बच्चन 28 दिवसांपासून नानावटी रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये कोविड-19 वर उपचार घेत होता. 11 जुलैच्या संध्याकाळी तो आणि अमिताभ बच्चन हे लक्षण दिसल्यानंतर रुग्णालयात गेले होते. अभिषेकने कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची बातमी ट्विटरवर दिली होती. त्याने लिहिले होते की, 'आज आम्ही दोघं, माझे वडील आणि मी कोविड-19 पॉझिटिव्ह आलो आहोत. आम्हाला दोघांना सौम्य लक्षण होती. यानंतर आम्ही रुग्णालयात दाखल झालो आहोत. आम्ही सर्व आवश्यक अथॉरिटीजला माहिती दिली आहे आणि आमचे कुटुंब आणि स्टाफच्या सदस्यांची टेस्ट केली जात आहे. मी सर्वांना शांत राहण्याची आणि चिंता न पसरवण्याची विनंती करतो. धन्यवाद'

इंस्टाग्रामवर शेअर केला डिस्चार्ज प्लान

अभिषेक बच्चनने शनिवारी हॉस्पिटलमधून आपल्या केअर बोर्डचा फोटो शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे 'मी तुम्हाला म्हणालो होतो. डिस्चार्ज प्लान- हो. आज दुपारी माझा कोविड-19 रिपोर्ट निगेटिव्ह आला. प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी सर्वांचे आभार. मला घरी जाण्याचा खूप आनंद आहे. नानावटी रुग्णालयाचे डॉक्टर्स आणि नर्सिंग स्टाफचे खूप खूप आभार त्यांनी माझी आणि माझ्या कुटुंबाची खूप काळजी घेतली आणि आम्हाला कोविड-19 वर मात करण्यास मदत केली. तुमच्याशिवाय हे शक्य नव्हते.'

बातम्या आणखी आहेत...