आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घराणेशाहीवर ज्युनिअर बच्चनची प्रतिक्रिया:अभिषेक बच्चन म्हणाला- वडिलांनी माझ्यासाठी कधीही चित्रपट बनवला नाही, त्यांनी कधीच मला मदत केली नाही

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिषेक बच्चनने 2000 मध्ये 'रेफ्यूजी' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.

अभिषेक बच्चनने सध्या बॉलिवूडमध्ये सुरु असलेल्या घराणेशाहीच्या मुद्द्यावर आपले म्हणणे मांडले आहे. त्याने सांगितल्यानुसार, 20 वर्षांच्या करिअरमध्ये वडील अमिताभ बच्चन यांनी कधीच त्याला मदत केली नाही. एका कलाकाराच्या करिअरमध्ये केवळ प्रेक्षकच त्याची मदत करु शकतात, असे मत अभिषेकने व्यक्त केले आहे.

'पापाने माझ्यासाठी चित्रपट बनवला नाही'

आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना अभिषेकने आपल्या वडिलांविषयी सांगितले की, "सत्य हे आहे की त्यांनी माझ्या शिफारशीसाठी कधी कुणाला फोन केला नाही आणि कधी कुणाचा फोन उचलला देखील नाही. त्यांनी माझ्यासाठी कधीच चित्रपटही बनवला नाही. उलट मी त्यांच्यासाठी 'पा' या चित्रपटाची निर्मिती केली. म्हणजे त्यांनी मला कधीही मदत केली नाही हे मी सांगू इच्छितो", असे अभिषेक म्हणाला.

अभिषेक पुढे म्हणतो, "लोकांनी समजून घ्यायला हवं की हा एक व्यवसाय आहे. पहिल्या चित्रपटानंतर जर प्रेक्षकांना तुमच्यात चार्म दिसला नाही, तुमच्या चित्रपटाचा बिझनेस झाला नाही, तर तुम्हाला पुढचा प्रोजेक्ट मिळणार नाही. आणि हेच आयुष्यातील कटू सत्य आहे", असे तो म्हणाला.

'मला माहित आहे की कोणत्या चित्रपटांत मला रिप्लेस केले गेले'

अभिषेकच्या मते, ही इंडस्ट्री कशी चालते, हे त्याला चांगलेच ठाऊक आहे. तो म्हणाला, "जेव्हा माझे चित्रपट चालत नाहीत ते मला माहित असते. कोणकोणत्या चित्रपटात माझ्या जागी दुस-या अभिनेत्याला घेतले गेले, हे मला ठाऊक आहे. मला अशा चित्रपटांची माहिती आहे जे पुढे डबाबंद झाले."

आवडता भूमिकेविषयी शाहरुखने दिलेला सल्ला लक्षात ठेवला

या मुलाखतीत अभिषेकला त्याच्या आवडत्या भूमिकेबद्दल विचारले असता तो म्हणाले की, “जेव्हा मी सिनेसृष्टीत आलो तेव्हा शाहरुख खानने मला कायम लक्षात राहावा असा एक सल्ला दिला होता. तो म्हणाला होता की, आवडती भूमिका ती हवी, जी तुम्ही त्यावेळी साकारत आहात. जर ती आवडती भूमिका नसेल, तर मग तुम्ही ती का साकारत आहात?”

पुढील चित्रपट 12 नोव्हेंबरला प्रदर्शित होतोय

अभिषेक बच्चन 'ब्रीद 2' या वेब सीरिजमध्ये दिसला होता आणि त्याच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते. त्याचा आगामी चित्रपट अनुराग बासू दिग्दर्शित 'लुडो' हा असून तो 12 नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे. अभिषेकशिवाय आदित्य रॉय कपूर, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रादेखील या चित्रपटात दिसणार आहेत.