आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिषेक बच्चन स्टारर 'द बिग बुल' हा चित्रपट रिलीज झाला आहे. 90 च्या दशकात स्टॉक मार्केटमध्ये कोट्यवधीचा घोटाळा करणा-या हर्षद मेहताची भूमिका अभिषेकने या चित्रपटात साकारली आहे. करिअरच्या दृष्टीने हा चित्रपट अभिषेकसाठी खूप महत्वाचा आहे. अभिषेक गेल्या 20 वर्षांपासून चित्रपटसृष्टीत आहे, परंतु त्याला अद्याप हवे तसे यश मिळालेले नाही. अभिषेक हा मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा मुलगा आहे. अशा परिस्थितीत, त्याच्या कामाची नेहमीच त्याच्या वडिलांशी तुलना केली जात असे, ज्यामुळे त्याचे मोठे नुकसान झाले.
तसे, एका मुलाखतीत अभिषेकने बॉलिवूडमध्ये सुरु असलेल्या घराणेशाहीच्या मुद्द्यावर आपले म्हणणे मांडले होते. त्याने सांगितल्यानुसार, 20 वर्षांच्या करिअरमध्ये वडील अमिताभ बच्चन यांनी कधीच त्याला मदत केली नाही. एका कलाकाराच्या करिअरमध्ये केवळ प्रेक्षकच त्याची मदत करु शकतात, असे मत अभिषेकने व्यक्त केले आहे.
'पापाने माझ्यासाठी चित्रपट बनवला नाही'
आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना अभिषेकने आपल्या वडिलांविषयी सांगितले होते, "सत्य हे आहे की त्यांनी माझ्या शिफारशीसाठी कधी कुणाला फोन केला नाही आणि कधी कुणाचा फोन उचलला देखील नाही. त्यांनी माझ्यासाठी कधीच चित्रपटही बनवला नाही. उलट मी त्यांच्यासाठी 'पा' या चित्रपटाची निर्मिती केली. म्हणजे त्यांनी मला कधीही मदत केली नाही हे मी सांगू इच्छितो", असे अभिषेक म्हणाला.
अभिषेक पुढे म्हणाला होता, "लोकांनी समजून घ्यायला हवं की हा एक व्यवसाय आहे. पहिल्या चित्रपटानंतर जर प्रेक्षकांना तुमच्यात चार्म दिसला नाही, तुमच्या चित्रपटाचा बिझनेस झाला नाही, तर तुम्हाला पुढचा प्रोजेक्ट मिळणार नाही. आणि हेच आयुष्यातील कटू सत्य आहे", असे तो म्हणाला होता.
'मला माहित आहे की कोणत्या चित्रपटांत मला रिप्लेस केले गेले'
अभिषेकच्या मते, ही इंडस्ट्री कशी चालते, हे त्याच्या वडिलांना चांगलेच ठाऊक आहे. तो म्हणाला होता, "जेव्हा माझे चित्रपट चालत नाहीत ते मला माहित असते. कोणकोणत्या चित्रपटात माझ्या जागी दुस-या अभिनेत्याला घेतले गेले, हेही मला ठाऊक आहे. मला अशा चित्रपटांची माहिती आहे जे पुढे डबाबंद झाले."
आवडत्या भूमिकेविषयी शाहरुखने दिलेला सल्ला लक्षात ठेवला
या मुलाखतीत अभिषेकला त्याच्या आवडत्या भूमिकेबद्दल विचारले असता तो म्हणाला होता की, “जेव्हा मी सिनेसृष्टीत आलो तेव्हा शाहरुख खानने मला कायम लक्षात राहावा असा एक सल्ला दिला होता. तो म्हणाला होता की, आवडती भूमिका ती हवी, जी तुम्ही त्यावेळी साकारत आहात. जर ती आवडती भूमिका नसेल, तर मग तुम्ही ती का साकारत आहात?”
गेल्यावर्षी रिलीज झाले होते दोन प्रोजेक्ट्स
'द बिग बुल'पुर्वी अभिषेक बच्चन गेल्या वर्षी 'ब्रीद 2' या वेब सीरिजमध्ये दिसला होता आणि त्याच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते. याशिवाय अनुराग बासू दिग्दर्शित 'लुडो' हा चित्रपट 12 नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता. अभिषेकशिवाय आदित्य रॉय कपूर, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा हे कलाकार देखील यात झळकले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.