आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐश्वर्याशी लग्नानंतर बदलले अभिषेकचे आयुष्य:म्हणाला - तिने मला आत्मविश्वास दिला, जो माझ्यात कधीच नव्हता

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनची एक जुनी मुलाखत चर्चेत आहे. यामध्ये अभिषेकला पत्नी ऐश्वर्याशी संबंधित एक प्रश्न विचाण्यात आला होता, अशी कोणती गोष्ट आहे, जी तो पत्नी ऐश्वर्याकडून शिकला. याचे उत्तर देताना अभिषेकने ऐश्वर्याचे कौतुक करत आयुष्यात तिच्याकडून खूप काही शिकल्याचे त्याने सांगितले. त्याचबरोबर ऐश्वर्यामुळे त्याच्यात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाल्याचेही तो म्हणाला.

ऐश्वर्याने मला सामान्य जीवन जगायला शिकवले
याबद्दल बोलताना अभिषेक म्हणाला होता, 'ऐश्वर्यासोबत लग्न केल्यानंतर माझ्यात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाला, जो माझ्यात आधी कधीच नव्हता. मी पूर्वी घरी खूपच लाडका होतो, माझ्या बहिणीचे लग्न झाले जी माझ्यासाठी खूपच प्रोटेक्टिव्ह होती. माझ्यावर कधीच कुठली जबाबदारी नव्हती, पण लग्नानंतर सगळं आपोआप बदलले. मला आतून वाटले की, मला या व्यक्तीसाठी जबाबदार असले पाहिजे, मला त्याचे संरक्षण आणि काळजी घ्यावी लागेल. ऐश्वर्यानेही मला आयुष्य सामान्य पद्धतीने जगायला शिकवले आहे,' अशी कबुली या मुलाखतीत अभिषेकने दिली होती.

ऐश्वर्याने कधीही मोठेपणा दाखवला नाही
अभिषेक म्हणाला होता, 'इतके प्रेम आणि प्रसिद्धी यातून गर्व चढणे अधिक सोपे आहे. पण मी माझे पाय जमीनीवर ठेऊ शकलो आणि याचे श्रेय माझ्या आई-वडिलांना आणि ऐश्वर्याला जाते. मी कोणासोबत राहतो- अमिताभ आणि जया बच्चन यांच्यासोबत. पण ऐश्वर्याने कधीही कुठल्या गोष्टीत मोठेपणा दाखवला नाही आणि माझ्याबाबतीत ते होऊ दिले,' असे अभिषेकने सांगितले होते.

2007 मध्ये झाले होते ऐश्वर्या-अभिषेकचे लग्न
20 एप्रिल 2007 रोजी ऐश्वर्या आणि अभिषेकचे लग्न झाले होते. अभिषेकने एका मुलाखतीत सांगितले होते की, जानेवारी 2007 मध्ये टोरंटोमध्ये 'गुरु' चित्रपटाच्या प्रीमियरनंतर त्याने हॉटेलच्या बाल्कनीमध्ये ऐश्वर्याला प्रपोज केले होते. या कपलच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर ऐश्वर्या लवकरच मणिरत्नम यांच्या 'पोन्नियन सेल्वन' या चित्रपटात दिसणार आहे. तर 'घूमर' हा अभिषेकचा आगामी चित्रपट आहे.

बातम्या आणखी आहेत...