आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रतिक्रिया:78 वर्षीय अमिताभ बच्चन रुग्णालयात दाखल असल्याच्या बातमीवर अभिषेक म्हणाला - ते माझ्यासमोर बसले आहेत, रुग्णालयात त्यांचा डुप्लिकेट असावा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिषेक बच्चनने हे वृत्त फेटाळून लावले आहे.

अमिताभ बच्चन प्रकृती बिघडल्यामुळे रूग्णालयात दाखल असल्याची चर्चा आहे. या वृत्तावर अभिषेक बच्चनने आपली प्रतिक्रिया दिली आहे. सोमवारी काही माध्यमांनी सांगितले की, बिग बींना दुखापत झाल्यामुळे शनिवारीपासून ते इस्पितळात उपचार घेत आहेत.

ही बातमी फेटाळून लावत बॉलिवूड हंगामाशी बोलताना अभिषेक म्हणाला, मी (अमिताभ बच्चन) त्यांनाच विचारतो, कारण ते माझ्यासमोरच बसले आहे. रुग्णालयात कदाचित त्यांचा डुप्लिकेट असेल.

  • बिग बी कोरोनातून पूर्णपणे बरे झाले

अमिताभ सध्या छोट्या पडद्यावर 'कौन बनेगा करोडपती -12' हा कार्यक्रम होस्ट करताना दिसत आहेत. यावर्षी 11 जुलै रोजी 78 वर्षीय अमिताभ यांना कोरोना झाला होता. त्यांच्याबरोबर मुलगा अभिषेक, सून ऐश्वर्या आणि नात आराध्या यांनाही कोरोनाने ग्रासले होते. रुग्णालयात जवळपास एक महिना घालवल्यानंतर बिग बी बरे होऊन घरी परतले. अभिषेक-ऐश्वर्या आणि आराध्या यांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. काही काळ विश्रांती घेतल्यानंतर बिग बींनी कौन बनेगा करोडपती -12 चे शूटिंग सुरू केले.

  • बिग बी अनेक रोगांशी झुंज देत आहेत

11 ऑक्टोबर 1942 रोजी जन्मलेल्या अमिताभ बच्चन यांना गेल्या 38 वर्षांपासून दमा, यकृत आणि मूत्रपिंडाचा त्रास आहे. काही दिवसांपासून अस्पष्ट दिसत असल्याचेही त्यांनी स्वतः काही महिन्यांपूर्वी सांगितले होते. आरोग्य तपासणीसाठी त्यांना अनेकदा नानावटी रुग्णालयात जावे लागते. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही दुपारी अडीच वाजता अमिताभ बच्चन यांची तब्येत अचानक बिघडली होती. त्यानंतर त्यांना तीन दिवसांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

  • बिग बी 25 टक्के यकृतावर जिवंत आहेत

‘कुली’ या चित्रपटाच्या सेटवर अपघात झाल्यापासून अमिताभ बच्चन यांना यकृतची समस्या आहे. त्यांचे यकृत 75% निकामी झाले आहे. ते केवळ 25 टक्के यकृतावर जिवंत आहेत. खरं तर, अपघातानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात जेव्हा बिग बींची प्रकृती चिंताजनक होती, तेव्हा त्यांच्यासाठी सुमारे 200 रक्तदात्यांकडून 60 बाटल्या रक्त गोळा केले गेले होते. यावेळी बिग बींना हेपेटायटीस-बी संक्रमित व्यक्तीचे रक्त देण्यात आले होते. यामुळे त्यांच्या शरीरात संसर्ग झाला, जे यकृत सिरोसिसचे कारण ठरले.