आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रग्ज प्रकरण:शाहरुख-गौरीच्या पाठिशी बॉलिवूड, आता अभिषेक कपूर, जॉनी लिव्हर आणि सोनू सूद यांनी पोस्ट शेअर करत दिला पाठिंबा

7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आतापर्यंत अनेक सेलेब्स शाहरुखच्या कुटुंबाच्या समर्थनार्थ आले पुढे

क्रूझ ड्रग्स प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर बॉलिवूडमध्ये सध्या खळबळ माजली असून अनेक सेलिब्रिटी शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी यांना पाठिंबा देताना दिसत आहेत. हृतिक रोशन, सुझान खान, रवीना टंडन यांच्यानंतर आता जॉनी लिव्हर, निर्माते अभिषेक कपूर, आणि सोनू सूद यांनीही शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबाला सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून पाठिंबा दिला आहे.

गौरी आणि शाहरुखसाठी प्रार्थना: अभिषेक
अभिषेक कपूरने पोस्ट शेअर करत लिहिले, "गौरी आणि शाहरुखसाठी प्रार्थना. हरी ओम."

तर दुसरीकडे जॉनी लिव्हर यांनी शाहरुख खानसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे जॉनी लिव्हर यांनी एक शब्दही न लिहिता या कठिण काळात मी तुझ्यासोबत आहे, असा संदेश दिला आहे.

कायदा वेळ घेईल: सोनू सूद
सोनू सूदने पोस्ट शेअर केली आणि लिहिले, "कायदा आपला वेळ घेईल. पण या काळात मानवता आणि आत्म्यावरून काढलेला पडदा नेहमीच तुमच्या चारित्र्याचा दाखला देईल. उद्या पुन्हा एक नवी पहाट होईल. फक्त तुम्ही धैर्य राखा." सोनूने या पोस्टमध्ये आर्यनच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. पण, ही पोस्ट त्याने आर्यन खान प्रकरणाबद्दल केली, असा अंदाज वर्तवला जातोय.

आतापर्यंत अनेक सेलेब्स शाहरुखच्या कुटुंबाच्या समर्थनार्थ आले पुढे
अभिषेक, जॉनी आणि सोनू यांच्या आधी, हृतिक रोशन, त्याची पुर्वाश्रमीची पत्नी सुझान खान, सुनील शेट्टी, हंसल मेहता, पूजा भट्ट, आलिया भट्ट, रवीना टंडन, राखी सावंत यांच्यासह बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबियांनी पाठिंबा दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...