आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लघुपटांची मोठी बाजारपेठ:शॉर्ट फिल्मसाठी सुमारे 1000 प्लॅटफॉर्म्स, बॉलिवूड आणि वेब सीरिजला समांतर एक नवीन इंडस्ट्री, एकाच वर्षात दोन ते तीनपट होऊ शकते कमाई

मनीषा भल्ला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज लघुपटांसाठी सुमारे 1000 प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत.

शॉर्ट फिल्म हे एकेकाळी सर्जनशीलता किंवा एखादा विशिष्ट विषय लोकांपर्यंत पोहोचवण्याचे साधन होते, परंतु आता हे एक फुल टाइम प्रोफनल झाले आहे. शॉर्ट फिल्म हे कमी वेळात, कमी खर्चात अधिक कमाईचे बिझनेस मॉडेल बनले आहे. ओटीटी, मोबाईल अॅप्स, यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्ममुळे लघुपटांचा समांतर उद्योग उदयास आला आहे. या माध्यमातून वर्षातून दोन ते तीन वेळा कमाई करणे देखील शक्य झाले आहे. आज लघुपटांसाठी सुमारे 1000 प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत.

ट्रान्झिट व्ह्यूइंग वाढले

यूट्यूबवर अडीच लाख सब्सक्राइबर मिळवणा-या गोरिल्ला शॉर्ट चॅनेलचे संचालक अंबर चक्रवर्ती म्हणतात की, देशात ट्रान्झिट व्ह्यूइंग (म्हणजे प्रवासादरम्यान चित्रपट किंवा इतर गोष्टी पाहण्याचे चलन) देशात वाढले आहे. विमानतळ किंवा रेल्वे स्टेशनसारख्या ठिकाणी किंवा कामावर जाताना प्रवासात लोक शॉर्ट फिल्म बघतात. अर्ध्या तासात चांगली कथा बघायला प्रत्येकाला आवडते.

अंबर सांगतात की, आता याकडे लोक केवळ छंद म्हणून बघत नाहीत. लोक प्रोफेशनली फिल्म मेकिंग शिकतात, काही लोक त्यात विशेष गुंतवणूक देखील करतात. प्रत्येक ओटीटी प्लॅटफॉर्मवर लघुपटांसाठी स्वतंत्र विभाग असतो. एक प्रकारे स्वतः ही एक इंडस्ट्री आहे. माझे एक यूट्यूब चॅनेल आहे, त्याचे सर्व चित्रपट डिस्ने हॉटस्टारवर देखील आहेत.

प्रत्येक माध्यमासाठी कमी वेळ

कान्स फिल्म फेस्टिव्हल आणि व्हँकुव्हर फिल्म फेस्टिव्हलपर्यंत पोहोचणाऱ्या 'मराठा मंदिर सिनेमा' या शॉर्ट फिल्मचे निर्माते पंकज दुबे सांगतात, प्रत्येक माध्यमासाठी लोकांकडे खूप कमी वेळ असतो. अशा परिस्थितीत कमी वेळेत चांगला आशय देणारा लघुपट क्लिक होत आहेत.

शॉर्ट फिल्म बनवणे हा एक प्रकारचा ड्राय-रन आहे. याचा अर्थ, जर तुमची त्यावर पकड बसली तर एक मोठी फीचर फिल्म बनवणे सोपे होईल. तुमच्यावर विश्वास ठेवणारे गुंतवणूकदारही तुम्हाला मिळतात.

पे पर व्ह्यू अॅप
चेन्नईच्या एस. एस. भारानीधरन आणि पी. सेंथिल कुमार यांनी 2019 मध्ये केवळ शॉर्ट फिल्मसाठी शॉर्ट फ्लिक्स अॅप सुरु केले. हे अॅप पे-पर-व्ह्यू मॉडेलवर चालते. एक शॉर्ट फिल्म फक्त 10 रुपयांमध्ये आणि 30 रुपयांत प्रीमियम कंटेंट उपलब्ध आहे. त्याचे दीड लाख सब्सक्राइबर्स आहेत.

भारानीधरन आणि सेंथिल कुमार यांनी तामिळ, तेलुगू आणि मल्याळम लघुपटांपासून सुरुवात केली. सेंथिल कुमार यांनी सांगितले की, आम्ही खूप नफा कमवत आहोत. म्हणून, हिंदी व्यतिरिक्त, कन्नड, इंग्रजी आणि स्पॅनिशमध्ये देखील शॉर्ट फिल्म आणि शॉर्ट वेब सीरिज मध्ये विस्तार करत आहेत.

150 चित्रपटांचे रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेल

दिल्लीच्या राहुल दत्ता यांचे 150 लघुपट अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. राहुलचे चित्रपट अमेझॉन यूके आणि अमेरिकेतही बघितले जातात. राहुल प्रत्येक ओटीटी प्लॅटफॉर्मसह 50- 50% रेव्हेन्यू शेअरिंगचा करार करतात. त्यांच्या लघुपटात मोठ्या चित्रपटांमधील खलनायक रणजीत यांनीही काम केले आहे.

राहुल सांगतात की, भारतातील लघुपटांची बाजारपेठ इतकी वाढली आहे की, आता त्याचे वेगळे वितरक आहेत. कामाची कमतरता नाही, किंवा गुंतवणूकदारदेखील कमी नाहीत.

राहुल यांची शॉर्ट वेब सीरिज 'बेचारे'च्या सीझन 1 चा निर्मिती खर्च 25 लाख रुपये होता. एमएक्स प्लेयरसह सुमारे दहा प्लॅटफॉर्मवर ही सीरिज रेव्हेन्यू शेअरिंगवर सुरु आहे. हा खर्च एका वर्षात पूर्ण झाला आणि आता त्याचा सीझन 2 येत आहे.

12 आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर एक चित्रपट
लघुपट निर्माते मिहिर धीरजलाल उपाध्याय सांगतात की, माझा 'गुड नाईट-स्लीप टाइट' हा चित्रपट दीड महिन्यात भारतासह 12 आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म्स आणि भारती एअरटेल, हंगामा आणि एमएक्स प्लेयरवर आला आहे. चित्रपटाचा तीन लाखांचा निर्मिती खर्च 12 महिन्यांत वसूल होईल. माझी अमेझॉन प्राइमशी देखील बोलणी सुरु आहेत, जिथे मला दुप्पट कमाई होण्याची अपेक्षा आहे. मिहिर यांचा आणखी एक चित्रपट 'द ब्लाइंड डेट' चार लाखात बनला आहे. MX Player आणि Eros Now सारख्या प्लॅटफॉर्मवरुन त्यांना दोन किंवा तीन पटीने कमाई होण्याची अपेक्षा आहे.

लघुपटांमधील मोठे चेहरे

  • 'कालीपीली टेल्स' अलीकडेच नेटफ्लिक्सवर आला आहे. यात सयानी गुप्ता, विनय पाठक, गौहर खान आणि सोनी राजदानसारखे सुप्रसिद्ध चेहरे होते.
  • मनोज बाजपेयी आणि गजराज राव यांनी नेटफ्लिक्सच्या 'रे' सीरिजमध्ये स्वतःची छाप पाडली आहे. मणिरत्नम यांच्या नेतृत्वाखाली 'नवरस'मध्ये तामिळ चित्रपटसृष्टीतील बडे स्टार्स आणि दिग्दर्शकांनी साहित्याच्या नऊ रसांवर आधारित नऊ लघुपट बनवले.
  • प्रसाद कदम दिग्दर्शित 'हॅपी बर्थडे' या लघुपटातील भूमिकेसाठी अभिनेते अनुपम खेर यांना न्यूयॉर्क सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.
  • टिस्का चोप्राने स्वतः 'चटणी' ही शॉर्ट फिल्म बनवली जी या जॉनरमध्ये सुपरहिट मानली जाते.
  • अभिनेत्री शेफाली शाहने नुकतेच 'हॅप्पी बर्थडे मम्मी जी' या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण केले आहे.
बातम्या आणखी आहेत...