आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांत आत्महत्या प्रकरण:रिया आणि तिच्या भावासोबत कंपनी सुरू केल्यानंतर डिप्रेशनमध्ये गेला होता सुशांत, रियाच्या वडिलांच्या पत्त्यावर रजिस्टर्ड आहेत दोन्ही कंपन्या

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांत आत्महत्या प्रकरणाला आता नवीन वळण आले आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाला नवीन वळण आले आहे. रियाविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पाटणा पोलिस तिच्याविरोधात पुरावे गोळा करत आहेत. दरम्यान, सुशांतच्या ज्या दोन कंपन्यात रिया आणि तिचा भाऊ डायरेक्टर होते, त्या दोन्ही कंपन्या रियाचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती यांच्या पत्त्यावर रजिस्टर्ड असल्याची माहिती आता समोर आली आहे. पहिली कंपनी सुरू केल्यावर काही दिवसांतच सुशांत डिप्रेशनमध्ये गेला होता, अशीही माहिती मिळाली आहे.

सुशांतने रियासोबत मिळून 'विविडरेज रियालिटीएक्स प्रायव्हेट लिमिटेड' (Vividrage RhealityX Pvt Ltd) आणि 'फ्रंट इंडिया फोर वर्ल्ड फाउंडेशन' या दोन कंपन्या सुरू केल्या होत्या. या पैकी पहिली कंपनी विविडरेजची स्थापना सप्टेंबर 2019 मध्ये झाली होती.

  • रियाने स्वतःच्या भावाला बनवले होते डायरेक्टर

रिपोर्ट्सनुसार, त्यावेळी रियाने सुशांतला गळ घालून केवळ तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीला कंपनीचा डायरेक्टरच बनवले नाही, तर कंपनीच्या नावात स्वतःचे नाव सामिल करुन Reality चे स्पेलिंग बदलून ते 'Rhea'lity केले होते.

  • सुशांतने डिप्रेशनमध्ये असताना शोविकबरोबर दुसरी कंपनी केली सुरु

रियाबरोबर कंपनी सुरू केल्याच्या काही महिन्यांनंतर सुशांतला नैराश्याने ग्रासले. याकाळात तो वेगवेगळ्या डॉक्टरांकडून उपचार घेत होता. दरम्यान, जानेवारी 2020 मध्ये सुशांतने उपचारादरम्यान, शोविकने त्याच्यासोबत मिळून आणखी एक कंपनी सुरु केली, त्याचे नाव 'फ्रंट इंडिया फॉर वर्ल्ड फाऊंडेशन' हे आहे.

  • रियाच्या वडिलांच्या पत्त्यावर रजिस्टर्ड आहेत दोन्ही कंपन्या

झी न्यूजच्या वृत्तानुसार, या दोन्ही कंपन्या नवी मुंबईतील उल्वास्थित एका फ्लॅटच्या पत्त्यावर रजिस्टर्ड आहेत. हा फ्लॅट रिया आणि शोविकचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती यांच्या नावी आहे.

  • सुशांतच्या मृत्यूपूर्वी रियाने आपल्या पदाचा दिला राजीनामा

जूनमध्ये सुशांतने आत्महत्या करण्याच्या काही दिवसांपूर्वीच रियाने विविडेज रियालिटीएक्सच्या आपल्या डायरेक्टर पदाचा राजीनामा दिला होता. सुशांतने या दोन्ही कंपनीत मोठी गुंतवणूक केली होती.

  • सुशांतच्या वडिलांनी तक्रार दाखल केली

26 जून रोजी रियाविरोधात सुशांतच्या वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. सुशांतचे वडील के.के सिंह यांच्या तक्रारीवरुन रियासह तिचे वडील इंद्रजित चक्रवर्ती, आई संध्या चक्रवर्ती, भाऊ शोविक चक्रवर्ती आणि दोन व्यवस्थापक सौमिल चक्रवर्ती आणि श्रुती मोदी यांच्याविरोधात पाटण्यातील राजीव नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रिया चक्रवर्तीविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे, फसवणूकीसह विविध कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

  • रियावर फसवणुकीचा आरोप

सुशांतच्या वडिलांनी रियावर या आरोपांसह पैसे उकळल्याचा आरोपही केला आहे. पोलिसांना दिलेल्या आपल्या जबाबात त्यांनी सांगितले की, "माझ्या मुलाच्या बँक खात्याच्या स्टेटमेंटवरुन गेल्या एका वर्षात त्यातून सुमारे 15 कोटी रुपये काढले गेल्याचे मला समजले आहे. ज्या ठिकाणी पैसे ट्रान्सफर केले गेले त्या ठिकाणी माझ्या मुलाचा काही संबंध नव्हता. रियाने आपल्या कुटुंबीय व सहकार्‍यांसह मिळून माझ्या मुलाच्या बँक खात्यातून आणि क्रेडिट कार्डातून किती पैसे काढले? याची सखोल चौकशी व्हावी', असे ते म्हणाले आहेत. पाहिजे.