आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादक्षिणेत सध्या अजितकुमार यांच्या ‘वलीमाई’ चित्रपटाची चर्चा जोरात आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन एच. विनोथने केले आहे. बोनी कपूर यांनी निर्मिती केली आहे. हा चित्रपट तेलगू, तामिळ, कन्नड आणि हिंदीत पॅन इंडियामध्ये 24 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘वलीमाई’मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीची अॅक्शन पाहायला मिळणार आहे. चित्रित करण्यासाठी 150 दिवस लागले. त्यापैकी कमीत कमी 80 दिवस अॅक्शन सीन शूट करण्यास लागले. एक-एक अॅक्शन दृश्य चित्रित करण्यासाठी 20 ते 25 दिवस लागले. चित्रपटातील आणखी महत्त्वाच्या बाबींवर निर्माते बोनी कपूर यांच्याशी झालेला हा संवाद...
बोनी यांनी सांगितले, आम्ही रस्ते, लाइव्ह लोकेशन आदीवर शूटिंग केले. कोरोनामुळे परवानगीची अडचण आली होती. आमच्या युनिटमध्ये 300 ते 400 लोक होते. सेफ्टी प्रोटोकॉल पाळत होतो. सेटवर दोन-दोन अॅम्ब्युलन्स आणि बरेच डॉक्टर हजर असत. चित्रपटाच्या अॅक्शन दृश्यात 100 ते 125 मोटारसायकलचा वापर झाला. 15 ते 20 गाड्या वापरल्या. काही ब्लास्टदेखील केले. काही बस आणि त्यांची बॉडीचा वापर केला.
हुमा कुरेशी पाेलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत
हुमा एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. भूमिकेसाठी दक्षिणेच्या आणि बॉलीवूडच्या दोन्हीकडच्या मुली डोक्यात होत्या. मात्र फायनली मी हुमाची निवड केली. आयुक्तलयाचा एक मॉडर्न सेट उभारला आहे. एक मॉनिटर रूम बनवले आहे. चित्रपटासाठी संपूर्ण सेट तयार करण्यात आला असून लाइव्ह लोकेशनसाठी रस्त्याचे चित्रीकरण केले आहे.
मार्चमध्ये सुरू होणार अजितसोबतचा तिसरा चित्रपट
मार्चमध्ये अजितसोबत तिसरा चित्रपट ‘एक 61’ सुरू होणार आहे. चित्रपटाशी जोडलेला एक मोनोक्रोम फोटो शेअर केला आहे. यात त्यांचे पांढरे केस आणि पांढरी दाढी दिसत आहे. चित्रपटाचे शूटिंग शेड्यूल सात महिन्यांचे ठेवले आहे. चेन्नईमध्ये यासाठी एक भव्य सेट बनवण्यात आला आहे. मला त्यांची क्षमता माहित आहे. ते जेव्हा मला भेटायला येतात तेव्हा मलाच नव्हे तर माझा चालक, ऑफिस बॉय, सेटवरील मुले सर्वांना अगदी घरासारखे भेटतात हेच त्यांचे वैशिष्ट्य आहे. असो. ‘वलीमाई’साठी अजितचे डबिंग चार-पाच दिवस आणखी चालणार आहे, तर हिंदीत डब करण्यासाठी पूर्ण आठवडा लागणार आहे. याच्या हिंदी व्हर्जनमध्ये दोन गाणी आहेत.
एका अॅक्शन दृश्यात जखमी झाले होते अजितकुमार
चित्रपटाच्या अॅक्शन सिक्वेन्सदरम्यान बाइक उलटली. अजित साहेब स्वतः ते चालवत होते. या अॅक्शन सीनमध्ये त्यांना दुखापतही झाली. त्यांचे गुडघे आणि पाय सोलले होते, पण दुसऱ्या दिवशी तो शूटिंगसाठी सेटवर वेळेवर आले. अजित यांच्यावर मोटारसायकल उलटल्याचे दृश्य चित्रपटातही दिसेल.
बोनी म्हणाले, ‘वलीमाई’मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीचे अॅक्शन दृश्य पाहायला मिळेल
रशियावरून विकत घेतल्या 20 ते 30 मोटारसायकली
चित्रपटात खलनायक आणि चोर काम पूर्ण झाल्यावर गाड्या एका जागी फेकून देतात. नंतर शोधण्यासाठी जातात तेव्हा त्यांना 300 ते 400 बाइक सापडतात, त्या क्रेनच्या साहाय्याने पाण्यातून काढल्या जातात. त्यासाठी आम्ही जुन्या मोटारसायकली विकत घेतल्या, ज्या पाण्यात टाकल्या होत्या. हीरो आणि व्हिलनच्या एक-एक मोटारसायकलच्या तीन-तीन आयडेंटिकल मोटारसायकल असत. इतर फायटरच्या वेगळ्या असत. आम्ही रशियामध्ये जाऊन 25 ते 30 मोटारसायकल विकत घेतल्या होत्या, कारण एक अॅक्शन दृश्य रशियामध्ये केले होते. शूटिंगनंतर त्या अर्ध्या किंमतीत विकल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.