आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडन:आमिर खानने पिठाच्या पिशवीतून वाटले नाहीत 15 हजार रुपये, म्हणाला - पैसे लपवून वाटणारी व्यक्ती मी नाही 

मुंबई3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मित्रांनो, पिठाच्या पिशवीत पैसे लपवून वाटणारी व्यक्ती मी नाही, असे आमिर खान म्हणाला आहे.

करोना विषाणूशी लढण्यासाठी बॉलिवूड कलाकार पुढे सरसावले आहेत. अनेक जण आपापल्या परीने गरजूंना मदत करत आहेत. परंतु अभिनेता आमिर खानने मात्र गरजूंच्या मदतीसाठी चक्क एक किलो पिठाच्या पिशवीतून 15 हजार रुपये वाटले, असा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. मात्र आता आमिरने स्वतः याचे खंडन केले आहे. त्याने आपल्या ट्विटरवर लिहिले आहे, "मित्रांनो, पिठाच्या पिशवीत पैसे लपवून वाटणारी व्यक्ती मी नाही. एकतर ही एक फेक स्टोरी असावी किंवा रॉबिन हूड स्वत: बद्दल काही सांगू इच्छित नाही. सुरक्षित रहा. तुम्हाला खूप प्रेम. आमिर.'

काय प्रकरण आहे?

काही दिवसांपूर्वी अनिल कुमार खलिंग नावाच्या फेसबुक यूजरने एक पोस्ट शेअर करताना सांगितले होते की, आमिर खानने 1 किलो पिठाच्या पिशवीतून 15 हजार रुपये गरीबांना वाटले. ज्यांनी पिठाची पिशवी घेतली त्यांना ती उघडल्यानंतर आश्चर्य वाटले. शिवाय एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमधील व्यक्तीने आमिर खानने 15 हजार रुपये वाटल्याचा दावा केला होता. मध्यरात्री गरीबांच्या वस्तीत एक ट्रक आला. या ट्रकमध्ये एक-एक किलो पिठाच्या पिशव्या होत्या. ज्या लोकांना पिठाची गरज आहे त्यांनी ट्रकजवळ यावे आणि पिठ घेऊन जावे अशी घोषणा करण्यात आली. ही पिशवी जेव्हा गरीबांनी खोलून पाहिली तेव्हा त्यात 15 हजार रुपयांच्या नोटा सापडल्या. अशाप्रकारे अनोख्या पद्धतीने आमिरने लोकांची मदत केली आहे, असा दावा या व्हिडिओमधील व्यक्तीने केला होता. 

बातम्या आणखी आहेत...