आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तौक्तेचा तडाखा:चक्रीवादळामुळे अजय देवगणच्या 'मैदान'चा सेट उद्धवस्त, निर्माते बोनी कपूर म्हणाले - 30 कोटींचे नुकसान झाले

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • निर्मात्यांनी 'मैदान'चा सेट वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण ते अयशस्वी झाले

तौक्ते चक्रीवादळाचा जोरदार तडाखा महाराष्ट्रात मुंबईला बसला. वादळी वारे आणि पावसाने मुंबईला झोडपून काढले होते. या वादळामुळे बॉलिवूड इंडस्ट्रीचे मोठे नुकसान झाले आहे. मुंबई व जवळपासच्या भागात तयार करण्यात आलेले आगामी चित्रपटांच्या सेट्सचे या वादळात उद्धवस्त झाले आहेत. या वादळामुळे अजय देवगणच्या आगामी मैदान या चित्रपटाचा सेट उडून गेला आहे. 'मैदान'चे निर्माता बोनी कपूर यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे की, वादळामुळे चित्रपटाच्या सेट उद्धवस्त होऊन जवळपास 30 कोटींचे नुकसान झाले आहे. तसेच चित्रपटाचा सेट पुन्हा तयार करावा लागणार आहे. तिस-यांदा हा सेट पुन्हा तयार करावा लागणार असल्याचे बोनी कपूर म्हणाले.

  • सेटवर आतापर्यंत 30 कोटी रुपये खर्च करूनही अद्याप काम पूर्ण झालेले नाही

निर्माता बोनी कपूर म्हणाले की, “सेट पूर्णपणे उध्वस्त झाला आहे, आम्हाला तिस-यांदा तो पुन्हा तयार करावा लागणार आहे. आम्हाला पहिल्यांदा सेट तोडावा लागला, जेव्हा पहिल्यांदा लॉकडाउन झाला. त्यानंतर आम्हाला पुन्हा सेट उभारावा लागला होता. त्यानंतर पुन्हा एकदा लॉकडाउन झाले होते. जर लॉकडाउन नसते तर आम्ही चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले असते. वादळामुळे पीच व्यतिरिक्त संपूर्ण सेट नष्ट झाला आहे. तसे, पीचचेही काही नुकसान झाले आहे, क्युरेटरने आम्हाला आश्वासन दिले. ते लवकरात लवकर ठिक करण्यात मदत करतील. पण, सेटवर आतापर्यंत आम्ही 30 कोटी रुपये खर्च केले आहेत आणि अद्याप काम पूर्ण झालेले नाही. "

  • निर्मात्यांनी 'मैदान'चा सेट वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण ते अयशस्वी झाले

वृत्तानुसार, मुंबईच्या बाहेरच्या परिसरात तयार केलेला ‘मैदान’ता सेट वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न निर्मात्यांनी केला होता, परंतु ते अयशस्वी झाले. चित्रपटाच्या सेटवर कुणालाही दुखापत झाली नाही पण सेट मात्र पूर्णपणे उध्वस्त झाला आणि त्यामुळे मोठे नुकसान झाले. असे म्हटले जात आहे की, अजय देवगण 'मैदान' च्या या सेटवर चित्रपटातील बहुतेक दृश्यांचे शूटिंग करणार होते. पण आता सेट उद्धवस्त झाल्याने चित्रपटाच्या शूटिंगला ब्रेक लागला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, जेव्हा वादळ आले तेव्हा 'मैदाना'च्या सेटवर 40 लोक उपस्थित होते. सेटवरील गार्ड्स आणि फुटबॉल मैदान बनवणा-या लोकांनी हा सेट वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही. 'मैदान' या चित्रपटाचे निर्माते बोनी कपूर आणि अमित शर्मा यांचा विचार होता की, 31 मे 2021 नंतर लॉकडाउन थोडा शिथिल होईल आणि त्यानंतर 15 ते 17 दिवसांत ते चित्रपटाच्या मॅचच्या भागाचे चित्रीकरण करतील. पण तौक्तेने त्यांच्या सर्व अपेक्षांचा भंग केला.

  • माझे चित्रपट थिएटरसाठी असतात: बोनी कपूर

काही दिवसांपूर्वी चित्रपटाविषयी असेही वृत्त आले होते की, 'मैदान' एका पे पर व्ह्यू सेवेअंतर्गत डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल. पण, बोनी कपूर यांनी अलीकडेच या वृत्तांचा खंडन करत एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. बोनी कपूर म्हणाले, "माझे चित्रपट थिएटरसाठी आहेत. आम्ही 'मैदान'च्या पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू केले आहे आणि आम्हाला हा चित्रपट चित्रपटगृहात आणायचा आहे." आणखी एका निवेदनात बोनी म्हणाले की, पे पे व्यू सेवेअंतर्गत 'मैदान' रिलीज करण्यासाठी कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मशी त्यांनी कोणतीही चर्चा केलेली नाही.

'मैदान' हा बोनी कपूर, आकाश चावला आणि अरुणाभ जॉय सेनगुप्ता निर्मित स्पोर्ट्स बायोपिक चित्रपट आहे. हा चित्रपट फुटबॉल खेळावर आधारित असून यामध्ये अजय देवगण फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीमची भूमिका साकारताना दिसणार आहे. अमित शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात अजय व्यतिरिक्त प्रियामणि, गजराज राव आणि रुद्रनील घोष मुख्य भूमिकेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...