आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

वादात वेब सीरिज:'मिर्झापूर 2' बॉयकॉटची मागणी, ट्विटरवर ट्रेंड होतोय #BoycottMirzapur2; अभिनेता अली फजलचे जुने ट्विट ठरले कारणीभूत

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मागील वर्षी सीएए प्रोटेस्टच्या काळात अली फजलने केलेले ट्विट याला कारणीभूत ठरले आहे.

गाजलेली वेब सीरिज 'मिर्झापूर'च्या दुसऱ्या सीझनची सर्वच चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. मिर्झापूर उत्तर प्रेदशातील मिर्झापूरवर आधारित आहे. वेब सीरिजच्या पहिल्या सीझनमधील प्रत्येक एपिसोड रोमांचक होता. मिर्झापूरच्या पहिल्या सीझनमध्ये अली फजल, पंकज त्रिपाठी, देव्यंदू शर्मा आणि विक्रांत मेसी या स्टार कास्टच्या अभिनयासोबत डायलॉग्सनी लोकांना अक्षरशः वेड लावले होते. गेल्या सोमवारी 'मिर्झापूर 2'च्या रिलीज डेटची घोषणा देखील करण्यात आली. येत्या 28 ऑक्टोबरपासून ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र एकीकडे चाहते वेब सीरिजची आतुरतेने वाट पाहात असताना काहींनी मात्र या वेब सीरिजच्या बॉयकॉटची मागणी केली आहे. त्यामुुळेच ट्विटरवर #BoycottMirzapur2 ट्रेंड करत आहे.

  • अली फजलचे जुने ट्विट ठरले कारणीभूत

बॉयकॉटचे कारण या वेब सीरिजमधील अभिनेता अली फजलचे जुने ट्विट ठरले आहे. मागील वर्षी सीएए प्रोटेस्टच्या काळात अली फजलने मिर्झापूरमधील एक डायलॉगचा वापर करत ट्विट केले होते. त्याने लिहिले होते, 'शुरु मजबूरी में किए थे, अब मजा आ रहा है..' यानंतर त्याने आणखी एक ट्विट केले होते, 'याद रखें- अगला कदम यह साबित करना नहीं क‍ि यह एक शांतिपूर्ण आंदोलन था बल्क‍ि इसकी जांच करना और असली घुसपैठ‍ियों से पर्दा उठाना, जो बाहर से इस आंदोलन में घुसे और हिंसा की।'

  • नंतर ट्विट केले होते डिलीट

अलीने नंतर हे दोन्ही ट्विट डिलीट केले होते. पण आता मिर्झापूर 2च्या रिलीज डेटची घोषणा झाल्यानंतर या सीरिजला टार्गेट केले जात आहे. टोलर्सने वेब सीरिजवर निशाणा साधत या सीरिजवर बहिष्कार घालण्याची मागणी केली आहे.

एका नेटक-याने ही वेब सीरिज बॉयकॉट करण्यासाठी आणखी एक कारण दिले आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, मिर्झापूर 2 चा एक्झिक्युटीव्ह प्रोड्युसर फरहान अख्तर आहे.

  • वेब सीरिजला चाहत्यांनी पाठिंबा देत मीम्स केले शेअर

दुसरीकडे चाहत्यांनी या वेब सीरिजला आपला पाठिंबा दर्शवला आहे. तसे मीम्सदेखील त्यांनी शेअर केले आहेत. चाहत्यांच्या मते, मिर्झापूर 2 ही वेब सीरिज नक्की बघायला हवी.

मिर्झापूरच्या पहिल्या सीझनमध्ये उपस्थित झालेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिर्झापूरच्या दुसऱ्या सीझनमध्ये मिळणार आहेत. मिर्झापूर सीरीज 2 वेब सीरीजमध्ये गुड्डू पंडितचा पुन्हा नवा अंदाज पाहायला मिळणार आहे. या सीरिजचा पहिला सीझन 16 नोव्हेंबर 2018 मध्ये रिलीज करण्यात आला होता. आता या बॉयकॉटचा किती प्रभाव वेब सीरिजवर पडतो हे येणा-या दिवसांतच स्पष्ट होईल.