आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या 'पुष्पा 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधत निर्मात्यांनी 'पुष्पा 2' चा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आणला. या टिझरवरुन पुष्पा जिवंत असल्याचे समोर आले आहे. हा टिझर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता कमालीची वाढली आहे. या चित्रपटाविषयीचे प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
अल्लू अर्जुनने दुपटीने घेतले मानधन
‘इ टाइम्स’च्या वृत्तानुसार ‘पुष्पा’ चित्रपट तुफान हिट झाल्यानंतर ‘पुष्पा 2’साठी अल्लू अर्जुनने दुप्पट मानधन आकारले आहे. 'पुष्पा' या चित्रपटासाठी अल्लूने 45 कोटी रुपये घेतले होते. तर 'पुष्पा 2' मध्ये पुष्पाराज ही भूमिका साकारण्यासाठी अल्लू अर्जुनने आता तब्बल 85 कोटी इतके मानधन घेतले आहे. इतकी मोठी रक्कम एका चित्रपटासाठी आकारून त्याने दक्षिणात्य सिनेसृष्टीत एक नवीन रेकॉर्ड तयार केला आहे. पण अद्याप अल्लू अर्जुनचा या चित्रपटातील मानधनाबाबत निर्मात्यांनी कोणतेही वक्तव्य केलेले नाही.
'पुष्पा'प्रमाणे 'पुष्पा 2'मध्येही अल्लू अर्जुनसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तसेच मीडिया रिपोर्टनुसार, 'पुष्पा द रुल' या सिनेमात साई पल्लवीची एन्ट्री होऊ शकते असे म्हटले जात आहे.
अल्लूच्या वाढदिवसापूर्वी प्रदर्शित करण्यात आले 'पुष्पा 2: द रुल'चे पोस्टर
'पुष्पा 2: द रुल'च्या निर्मात्यांनी 7 एप्रिल रोजी म्हणजे अल्लूच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक रिव्हिल केला. फर्स्ट लूक पोस्टरमध्ये अल्लू अर्जुन पूर्णपणे वेगळ्या अंदाजात दिसला. पोस्टरवर अल्लू अर्जुनने साडी आणि सोन्याचे दागिने घातलेले दिसले. याशिवाय त्याच्या गळ्यात हारतुरे आणि लिंबाचा हार दिसला. पोस्टरमध्ये अल्लू अर्जुनच्या हातात बंदूकही दिसली. पोस्टर पाहून अर्जुनने पोलिसांपासून वाचण्यासाठी हा गेट अप केला असावा, असा अंदाज चाहते वर्तवत आहे. ‘पुष्पा 2’ हा चित्रपट यावर्षी 16 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.