आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुःखद:अभिनेते अमिताभ दयाल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, अमिताभ बच्चन आणि ओम पुरी यांच्यासोबत केले होते पडद्यावर काम

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ते 61 वर्षांचे होते.

अभिनेते अमिताभ दयाल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मागील 13 दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान 2 फेब्रुवारी रोजी पहाटे 4 वाजून 30 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 61 वर्षांचे होते.

अमिताभ दयाल यांच्या पत्नी मृणालिनी पाटील यांनी त्यांच्या निधनाचे वृत्त दिले. त्यांनी सांगितल्यानुसार, '17 जानेवारी रोजी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. उपाचारानंतर शनिवारी ते कोरोनामुक्त झाले होते. मात्र आज पहाटे पुन्हा त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.'

अमिताभ दयाल यांनी अमिताभ बच्चन यांच्यासह 'विरुद्ध' आणि दिवंगत अभिनेते ओम पुरी यांच्या 'कागर' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. याशिवाय त्यांनी त्यांच्या पत्नी मृणालिनी पाटील दिग्दर्शित धुआं (2013), रंगदारी (2012), ये दिल्लगी (2013) यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले होते.

अमिताभ दयाल यांचा जन्म बिलासपूर, छत्तीसगड येथे झाला. मृणालिनी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमिताभ दयाल यांचे काही नातेवाईक छत्तीसगडहून येणार आहेत. त्यानंतर आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.

बातम्या आणखी आहेत...