आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ज्येष्ठ अभिनेत्याने केली मदतीची याचना:'बँडिट क्वीन'सह अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये झळकलेले अभिनेते अनुपम श्याम आयसीयूत, बॉलिवूड सेलिब्रिटींकडे मागत आहेत मदत

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वृत्तानुसार, सोमवारी घरात पडल्यानंतर अनुपम श्याम यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
  • आमिर खान, सोनू सूद यांच्याकडे मदतीची याचना, सह-अभिनेते मनोज बाजपेयी आला मदतीसाठी पुढे

'बँडिट क्वीन' (1994)), 'लज्जा' (2001), 'नायक' (2001) आणि 'शक्ती: द पॉवर' (2002) यासारख्या चित्रपटांमध्ये झळकलेले ज्येष्ठ अभिनेते अनुपम श्याम यांना मुंबईतील गोरेगाव येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. याबाबतची माहिती पत्रकार आणि चित्रपट निर्माते एस. रामचंद्रन यांनी ट्विटरवरुन दिली आहे. रामचंद्रन यांनी अनुपम यांच्या उपचारांसाठी आमिर खान आणि सोनू सूदकडे मदत मागितली आहे. सोमवारी रात्री अनुपम घरात पडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना किडनीचा आजार आहे.

रामचंद्रन यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे, "अभिनेते अनुपम श्याम आयसीयूमध्ये दाखल आहेत. त्यांनी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये मदत मागितली आहे." आमिर खान आणि सोनू सूद यांना पुढे टॅग केले गेले आहे. त्यांनी हे ट्विट रिट्विट करुन अनुपम यांच्यावर गोरेगाव येथील लाइफलाईन रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती दिली आहे.

  • मनोज बाजपेयी आला मदतीसाठी पुढे

अभिनेता मनोज बाजपेयी अनुपम श्याम यांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. ज्येष्ठ अभिनेते आजारी असून त्यांना मदतीची आवश्यकता असल्याचे समजताच मनोजने ट्विट केले की, "कृपया मला कॉल करा." अनुपम आणि मनोज यांनी 'बँडिट क्वीन', दस्तक 'आणि' संसोधन 'या चित्रपटात एकत्र काम केले आहे.

  • 'प्रतिज्ञा' मालिकेतील ठाकूर सज्जन सिंगच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध

'मन की आवाज प्रतिज्ञा' या टीव्ही मालिकेत अनुपम यांनी साकारलेले ठाकूर सज्जन सिंह हे पात्र खूप लोकप्रिय झाले होते. मुळचे उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील असलेले अनुपम लखनौच्या भारतेंदु अकादमीच्या नाट्य कला अकादमीचे माजी विद्यार्थी आहेत. येथे त्यांनी 1983-1985 दरम्यान अभिनयाचे धडे गिरवले होते. 2011 मध्ये अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचे ते समर्थकही राहिले आहेत.

  • अनुपम यांचे हे आहेत लोकप्रिय चित्रपट

अनुपम यांनी 'सरदारी बेगम' (1996)), 'दुश्मन' (1998), 'कच्चे धागे' (1999), 'परजानियां' (2005), 'गोलमाल' (2006), 'स्लमडॉग मिलेनिअर' (2008) आणि 'मुन्ना माइकल' (2017) या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. टीव्हीवर ते अखेरचे 'कृष्णा चली लंडन' (2018-2019) मध्ये दिसले होते.