आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मदतीचा हात:अर्जुन कपूरच्या व्हर्जुअल डेटने रोजंदारीवर काम करणा-या 300 कुटुंबाना मिळणार एक महिन्याचे जेवण

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अर्जुन कपूरने 300 रोजंदारी मजुरांच्या कुटुंबांसाठी एका महिन्याच्या रेशनसाठी निधी गोळा केला.

गरजू लोकांच्या मदतीसाठी अभिनेता अर्जुन कपूर प्रयत्नशील आहेत. गेल्या आठवड्यात त्याने 5 भाग्यवान विजेत्यांसोबत व्हर्जुअल डेट केली. यामधून जमा झालेला निधी भारतातील रोजंदारी मजुरांच्या मदतीसाठी देण्यात येणार आहे, ज्यांच्याकडे लॉकडाऊनच्या काळात उत्त्पनाचे दुसरे साधन नाही. अर्जुनने त्याची धाकटी बहीण अंशुला कपूरच्या ऑनलाइन फंडिंग प्लॅटफॉर्म असलेल्या फॅनकाइंडच्या माध्यमातून हा प्रयत्न केला आणि 300 रोजंदारी मजुरांच्या कुटुंबांसाठी एका महिन्याच्या रेशनसाठी निधी गोळा केला.

बहिणीच्या मोहिमेद्वारे मदत: अर्जुन म्हणाला, 'कोरोना विषाणूने आपल्या सर्वांना कठीण काळात ढकलले आहे. अंशुलाच्या फॅनकाइंडच्या पाच भाग्यवान विजेत्यांसोबत माझ्या 30 मिनिटांची व्हर्च्युअल डेटने अनेक कुटुंबांच्या जेवणासाठी पुरेशी रक्कम जमा करण्यात मदत केली. याबद्दल मी माझ्या सर्व चाहत्यांचा आभारी आहे. चॅटदरम्यान जमा झालेल्या निधीबरोबरच, गिव इंडियालाही अतिरिक्त मदत पोहोचवली आहे. हा सामूहिक फंड रोजंदारीवर काम करणा-यांच्या कुटुंबांना एका महिन्याचे रेशन देण्यासाठी मदत करेल. त्यांचे मनोबल वाढविण्यात आणि माझ्या क्षेत्राबाहेरील लोकांशी संपर्क साधण्यात आणि त्यांच्यामध्ये आशा आणि आत्मविश्वास वाढवल्याबद्दल मला आनंद झाला. पद्धत कुठलीही असो, या परिस्थितीवर मात करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत.

फॅनकाइंड म्हणजे काय : अर्जुन कपूरची बहीण अंशुला हिने सुमारे 6 महिन्यांपूर्वी फॅनकाइंड हा उपक्रम सुरू केला होता. याद्वारे चाहत्यांना त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटीसोबत ऑनलाइन भेट घालून दिली जाते.  सोबत त्यांच्यात फन अ‍ॅक्टिव्हिटी केली जाते. या उपक्रमांमधून मिळालेले पैसे चॅरिटीसाठी दिले जातात. 

बातम्या आणखी आहेत...