आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनी लॉन्ड्रिंग प्रकरण:चौकशीसाठी ED च्या ऑफिसमध्ये पोहोचला अभिनेता अरमान जैन, काही दिवसांपूर्वीच घरावर पडला होता ईडीचा छापा

8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ईडीला अरमान जैन हा टॉप सिक्युरिटी ग्रुपशी संबंधित असल्याचा पुरावा सापडला होता.

अभिनेता अरमान जैन हा टॉप सिक्युरिटी ग्रुप्सशी संबंधित 175 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील चौकशीसाठी ईडीच्या ऑफिसमध्ये पोहोचला आहे. विहंग सरनाईक यांच्यासोबतच्या मैत्रीमुळे अरमानचे नाव या प्रकरणात समोर आले आहे. ईडीने यापूर्वी 11 फेब्रुवारी रोजी त्याला चौकशीसाठी समन्स बजावला होता. मात्र वैयक्तिक कारण देत त्याने चौकशीसाठी येणे टाळले होते. अरमान हा अभिनेता रणबीर कपूर आणि करीना कपूर यांचा आतेभाऊ आहे.

अरमानचे मामा राजीव कपूर यांचे ज्या दिवशी निधन झाले त्याच दिवशी ईडीने अरमानच्या घरावर छापा टाकला होता. चौकशी दरम्यान, ईडीला अरमान जैन हा टॉप सिक्युरिटी ग्रुपशी संबंधित असल्याचा पुरावा सापडला होता. ईडीने काही तास घराची झडती घेतली आणि चौकशी पूर्ण झाल्यानंतर अरमान जैनला त्याचे मामा (राजीव कपूर) यांच्या अंत्यसंस्कारास जाण्याची परवानगी देण्यात आली. या प्रकरणाचा अधिक तपशील येणे बाकी आहे.

ईडीच्या ऑफिसमध्ये जाताना अरमान जैन
ईडीच्या ऑफिसमध्ये जाताना अरमान जैन

अरमान का अडकला?
अरमान जैनच्या घरीही तपास यंत्रणेने छापा टाकला होता. या घरात तो पत्नी अनिषा मल्होत्रा, आई रीमा जैन आणि इतर सदस्यांसह राहतो. या प्रकरणात त्याचे नाव शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग याच्याशी असलेल्या मैत्रीमुळे समोर आले आहे. या प्रकरणात विहंगची दोनदा चौकशी झाली आहे.

ईडीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरमान जैन व विहंग सरनाईक हे मित्र आहेत. या दोघांचे व्हाट्सअप चॅट ईडीला मिळाले आहे. त्या चॅटमध्ये दोघेही आर्थिक देवाणघेवाणीबाबत बोलत असल्याचे दिसून येत आहे. त्याआधारे ईडीने अरमानच्या घरी छापा टाकला होता. त्यात काही महत्त्वाची कागदपत्रे मिळाली. त्यामुळेच आता त्याला चौकशीसाठी बोलवले आहे.

हे आहे संपूर्ण प्रकरण
गेल्यावर्षी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतर्फे टॉप्स ग्रुपच्या माजी कर्मचा-यांच्या तक्रारीवरुन कंपनीचे प्रमोटर राहुल नंदा यांच्यासह 11 जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. या एफआयआरच्या आधारे ईडीने इंफोर्समेंट केस इंफर्मेशन रिपोर्ट (ईसीआयआर) दाखल केला. 28 ऑक्टोबर, 2020 रोजी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) टॉप्स ग्रुपने तब्बल 175 कोटींनी लुबाडले आहे. ईडीने 24 नोव्हेंबर रोजी मुंबई आणि ठाण्यात 10 ठिकाणी छापे टाकले होते. यात मुंबई आणि ठाण्यात सरनाईक आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या घर आणि कार्यालयाचा सामवेश आहे.

कोण आहे अरमान जैन?
अरमान हा रणधीर कपूर, ऋषी कपूर आणि राजीव कपूर यांची बहीण रीमा जैन यांचा मुलगा आहे. तो राज कपूर यांचा नातू आहे. अरमानने 2014 मध्ये 'लेकर हम दिवाना दिल' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. 'स्टुडंट ऑफ द इयर', 'एक मैं और एक तू' आणि 'माय नेम इज खान' यासारख्या चित्रपटात त्याने सहाय्यक म्हणून काम केले आहे. अरमान जैनने गेल्या वर्षीच अनिशा मल्होत्राशी लग्न केले होते.