आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भूमी पेडणेकरचा ‘दुर्गामती’ शुक्रवारी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. भूमी यात पहिल्यांदाच दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. एकीत भूमी चंचल मुलीची, तर दुसरीत भुताची भूमिका करणार आहे. तिचा सहकलाकार अर्शद वारसीने यानिमित्त दिव्य मराठीसोबत खास चर्चा केली...
भयपटात मी कधीच काम केले नव्हते. हा माझा पहिला हॉरर चित्रपट आहे. खरं तर माझे खरे आयुष्यदेखील हॉररने भरलेले आहे. मात्र मी चित्रपटात हसवण्याचे काम केले आहे. असो. हा चित्रपट लॉकडाऊन आधी ऑफर झाला होता. मला याची कथा आवडली होती. दिग्दर्शकही चांगले वाटले. मी यात एक प्रामाणिक राजनेत्याच्या भूमिकेत आहे. या पात्रासाठी मला वय आणि समजूतदारपणा दाखवायचा होता. त्यावर काम करावे लागले. चालण्याची स्टाइल हळू केली. बोलण्याची शैलीदेखील बदलली, जेणेकरुन मी अनुभव लीडर वाटवा.
दिग्दर्शक जी. अशोक आहेत. त्यांचा ‘भागमती’चा हा रिमेक आहे. त्यांचे व्हिज्युअल सेन्स चांगले आहेत. त्यांच्यासोबत पुन्हा काम करावेसे वाटते. भूमी खूपच मेहनती कलाकार आहे. जास्त मेहनत घेते. सेटवर तिची अवस्था पाहून तिची खूप दया वाटायची. तिच्या चेहऱ्यावर रक्ताचे डाग असायचे. केस मातीने माखलेले असायचे. ती तशीच सेटवर कधी-कधी झोपी जायची.
मी ‘एग्जॉरसिस्ट’ पाहून घाबरलो होतो. अनुष्का शर्माचा ‘परी’देखील पाहून घाबरलो हाेतो. खरंच यात घाबरवणारे दृश्य होते. अशा चित्रपटात लोक भुताचा चेहरा पाहून नव्हे तर पात्राचे हावभाव पाहून आणि आवाजामुळे घाबरतात.
खरं तर मला समोर बसून कथा ऐकणे आवडते. मात्र जोपर्यंत परिस्थिती पूर्ववत होत नाही तोपर्यंत आपल्याला सर्व सहन करावे लागेल. दुसरा काही पर्यायदेखील नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.