आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दुःखद:विकी डोनर फेम अभिनेता भूपेश पांड्या यांचे फुप्फुसांच्या कर्करोगाने निधन; उपचारांसाठी 25 लाखांची होती गरज, एक दिवसापूर्वीच चाहत्यांनी कॅम्पेनच्या माध्यमातून जमवले होते पैसे

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एनएसडीचे माजी विद्यार्थी असणाऱ्या भूपेश पांड्या यांच्या जाण्याने त्यांच्या सहकलाकारांनी देखील दु:ख व्यक्त केले आहे.

विकी डोनर, हजारों ख्वाहिशें ऐसी आणि दिल्ली क्राइम या चित्रपटांमध्ये झळकलेले अभिनेता भूपेश कुमार पांड्या यांचे बुधवारी निधन झाले आहे. दीर्घकाळापासून ते कॅन्सरशी झुंज देत होते. बुधवारी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती देण्यात आली.

NSD ने त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले की, 'प्रसिद्ध रंगकर्मी भूपेश कुमार पांड्या ( माजी विद्यार्थी एनएसडी 2001 बॅच ) यांच्या आकस्मिक मृत्यूची बातमी अतिशय दुःखदायक आहे. एनएसडी परिवार त्यांच्या प्रति श्रद्धांजली अर्पण करत आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.'

हलाखीच्या परिस्थितीमुळे त्यांच्यावर उपचार होऊ शकत नव्हते. फुप्फुसांच्या चौथ्या स्टेजच्या कॅन्सरशी लढा देत असलेल्या भूपेश यांच्यासाठी एक दिवसापूर्वीच ऑनलाइन कॅम्पेनच्या माध्यमातून 21 लाख रुपये जमा करण्यात आले होते. अहमदाबाद येथे त्यांच्यावर उपचार सुरु होते.

  • मनोज, राजेश आणि गजराज आले होते मदतीसाठी पुढे

गेले काही महिने ते या आजाराशी लढत होते. एनएसडीचे माजी विद्यार्थी असणाऱ्या भूपेश पांड्या यांच्या जाण्याने त्यांच्या सहकलाकारांनी देखील दु:ख व्यक्त केले आहे. अभिनेता मनोज वाजपेयी, गजराज राव यांनी भूपेश यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. काही दिवसांपूर्वी भूपेश यांच्या मित्राने त्यांच्या उपचारासाठी निधी आवश्यक असल्याचे शेअर केले होते. त्यांच्या कॅन्सरवरील उपचारासाठी हा निधी आवश्यक होता. त्यांच्या उपचारांसाठी 25 लाख रुपयांची गरज होती. त्यांच्या मदतीसाठी मनोज वाजपेयी, राजेश तैलंग आणि गजराज राव हे कलाकार पुढे आले होते. मनोज वाजपेयीने देखील याबाबत ट्विट शेअर केले होते. या फंडरेजर वेबसाइटनुसार गजरावर राव यांनी 25 हजारांची मदत केली होती.

भूपेश यांच्या पश्च्यात पत्नी छाया आणि दोन मुले आहेत. त्यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार ते कॅन्सरच्या चौथ्या स्टेजमध्ये होते. अहमदाबादमधील अपोलो हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.

गेल्या काही दिवसांपासून भूपेश हलाखीच्या परिस्थितीत होते. त्यांची पत्नी छाया शिक्षिका आहेत. मात्र लॉकडाऊनमध्ये त्यांची नोकरी गेली. त्यामुळे कुटुंबाला अडचणींचा सामना करावा लागतोय. भूपेश यांनी अनेक चित्रपट आणि टीव्ही शोजमध्ये काम केले होते.