आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसीकरणावर 'शेरशाह'चा अभिनेता:बिजय जे आनंदने लसीकरणाला मानवी इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा म्हटले, म्हणाले - काहीही झाले तरी मी लस घेणार नाही

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लसीकरण हा मानवी इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा आहे

एकीकडे अनेक सेलिब्रिटी लसीकरण मोहिमेला पाठिंबा देत आहेत आणि प्रत्येकाला लस घेण्याचे आवाहनही करत आहेत, पण बॉलिवूड अभिनेता बिजय जे आनंद म्हणतात की "मी कोरोनाची लस घेणार नाही." ते म्हणतात, “माझ्या हातातून दोन चित्रपट गेले आहेत, जे लंडनमध्ये शूट केले जाणार होते. मी एक मोठी वेब सीरिजदेखील गमावली, ज्याचे चित्रीकरण सर्बियामध्ये होणार होते. मी दुबईत एका पुरस्कार सोहळ्याला देखील उपस्थित राहू शकलो नाही. माझ्या हातून कितीही मोठ्या गोष्टी निसटल्या तरी, मी लस घेणार नाही,' असे आनंद यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

लसीकरण हा मानवी इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा आहे
माध्यमांशी बोलताना आपण लसीकरणाच्या बाजूने का नाही याचे उत्तर आनंद यांनी दिले आहे. ते म्हणतात, 'माझे शरीर माझ्यासाठी मंदिर आहे आणि मी माझ्या शरीरात रसायने टाकू शकत नाही. म्हणूनच मी लस घेत नाहीये."

पुढे बोलताना ते म्हणाले, 'माझ्या 14 वर्षांच्या मुलीला एका चित्रपटात पहिली भूमिका मिळाली आहे. ती लंडनला जात आहे, पण माझी पत्नी आणि मी दोघेही तिच्यासोबत जाऊ शकत नाही, कारण आम्ही दोघांनीही लस घेतलेली नाही. लंडन हे माझे दुसरे घर आहे आणि मला तिथे जायला नेहमीच आवडते.' ते म्हणतात, 'मला वाटते की लस ही एक राजकीय गोष्ट आहे आणि कदाचित मानवजातीच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा आहे.'

बिजय हे योगगुरूही आहेत
मी केवळ अभिनय करत नाही तर मी एक कुंडलिनी योग गुरु देखील आहे. माझे जगभरात अनेक विद्यार्थी आहेत आणि प्रत्येकजण माझ्यावर नाराज आहे, कारण मी प्रवास करु शकत नाहीये, असे आनंद सांगतात. 'माझे विद्यार्थी मला मँचेस्टर येथे होणा-या आंतरराष्ट्रीय योग महोत्सवात सहभागी होण्यासाठी आग्रह करत आहेत. मी तेथे मुख्य प्रशिक्षक देखील आहे. पण मी लस न घेतल्याने मला तिथे जाणे शक्य नाही. मी बऱ्याच गोष्टी सोडत आहे,' असे आनंद यांनी सांगितले.

मेट गालाला उपस्थित राहू शकली नाही निकी
अमेरिकन रॅपर निकी मिनाज अलीकडील मेट गालामध्ये उपस्थित राहू शकली नाही, कारण तिने देखील अद्याप लसीचा एकही डोस घेतलेला नाही. या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक होते.

बातम्या आणखी आहेत...