आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Actor Deepak Dobriyal Remembers Irrfan Khan On His First Death Anniversary, Said He Had A Great Brotherly Relationship With Me And Believed In Me Very Much

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आठवणीतील इरफान खान:अभिनेता दीपक डोबरियाल म्हणाले - 'त्यांच्यासोबत माझे मनाचे नाते होते, मोठी शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते कुणालाही भेटले नाहीत'

उमेश कुमार उपाध्याय9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दीपिक डोबरिया यांनी इरफान यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे...

इरफान खान यांच्यासोबत 'हिंदी मीडियम', 'अंग्रेजी मीडियम', 'मकबुल' या चित्रपटांमध्ये काम करणारे अभिनेते दीपक डोबरियाल त्यांच्या निकटवर्तीयांपैकी एक होते. दीपक यांना इरफान धाकट्या भावासारखे मानायचे. इतकेच नाही तर निर्मात्यांकडे त्यांच्या नावाची शिफारसदेखील करायचे. इरफान खान यांच्या पहिल्या पुण्यतिथीच्या निमित्ताने दीपिक डोबरिया यांनी त्यांच्या आठवणी शेअर केल्या आहेत...

इरफान भाई खूपच रिजर्व्ड राहात असत
दीपक डोबरियाल सांगतात, 'इरफान भाई खूपच रिजर्व्ड राहात असत. मात्र माझ्यासोबत थोडे बोलायचे. याला मी नशीबवान समजतो. त्यांचे माझ्यासोबत मोठ्या भावासारखे नाते होते. हिंदी मीडियमच्या शूटिंगच्या वेळी आम्ही सकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण सोबत घ्यायचो.'

मोठी शस्त्रक्रिया झाल्यानंतर कुणालाही भेटले नाहीत
दीपक डोबरियाल सांगतात, 'मला त्यांचे विचार आवडायचे. जीवनात माणूस जेव्हा नाराज, दुखी आणि मजबूर होतो, तेव्हा तो काय विचार करतो, त्याचा काय दृष्टिकोन असतो हे इरफान भाईने अंग्रेजी मीडियममध्ये दाखवले. आजारी पडल्याच्या एका वर्षानंतर त्यांनी हा चित्रपट करण्याचे ठरवले होते. चित्रपट पूर्ण केला तेव्हा चेह-यावर हास्य होते. अभिनयासाठी त्यांची ही आवड त्यांना महान अभिनेत्याच्या रांगेत नेऊन उभी करते. नंतर त्यांची मोठी शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर ते कुणालाही भेटले नाहीत.'

दुर्दैवाने त्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होऊ शकलो नाही
दीपक डोबरियाल म्हणाले, "हिंदी मीडियमच्या यशामुळे ते खूप आनंदी होते. हा त्यांचा पहिला चित्रपट होता जो सुपरहिट ठरला होता. लोक कलाकार म्हणायचे, की कलाकार मोठा आहे, पण हिट चित्रपट नाही. या चित्रपटाने प्रत्येकाचे तोंड बंद केले होते. या चित्रपटानंतर मी ज्या-ज्याठिकाणी त्यांच्याबरोबर जात असे, ते माझी स्वत:पेक्षा अधिक मोठा स्टार म्हणून ओळख करून द्यायचे. आमचे मनाचे नाते होते ज्याचे मी शब्दांत वर्णन करु शकत नाही. कारण प्रत्येकाला असे वाटेल की, मी त्यांच्या नावावर प्रसिद्धी एकवटत आहे. मी इरफान भाईंबरोबर जेवढा वेळ एकत्र घालवला, त्यातून बरेच काही शिकलो. जे मला आयुष्यभर पुरेल. त्यांचे छोट्या छोट्या भूमिकेतूनही सर्वांनी कौतुक केले. त्यांच्याजवळ कामाची कमतरता कधीच नव्हती, पण लुक्समुळे त्यांना अनेक अडचणी आळ्या. ते सांगायचे की, एकेकाळी लोक त्यांची तुलना मिथून चक्रवर्तीसोबत कारयचे. दुर्दैवाने मी त्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होऊ शकलो नाही. त्यावेळी लॉकडाऊन होता. आणि मी उत्तराखंडमध्ये अडकलो होतो. कार फ्लाइट काहीच सुरु नव्हते."

बातम्या आणखी आहेत...