आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Actor Dilip Kumar's Brothers Corona: Youngest Brother Aslam Khan Dies In Lilavati Hospital, Second Brother Ishaan Khan's Condition Also Critical

अभिनेते दिलीप कुमार यांच्या भावांना कोरोना:धाकटे भाऊ असलम खान यांचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन; दुसरे भाऊ 90 वर्षीय एहसान यांची प्रकृती चिंताजनक

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
असलम खान दिलीप कुमार यांच्या मागे ब्राऊन कुर्त्यात दिसत आहेत  -फाइल फोटो - Divya Marathi
असलम खान दिलीप कुमार यांच्या मागे ब्राऊन कुर्त्यात दिसत आहेत -फाइल फोटो
  • दोन्ही भावांची रॅपिड एंटीजन टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
  • दिलीप कुमार यांचे दोन्ही भाऊ असलम आणि एहसान वेगळ्या घरात राहात होते, त्यामुळे दिलीप कुमार आणि सायरा बानो यांना कोरोना संसर्ग झाला नाही.

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे सर्वात धाकटे बंधू असलम खान यांचे कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झाले आहे. मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला. ते 88 वर्षांचे होते. गुरुवारी रात्री त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

दिलीप कुमार यांचे दुसरे भाऊ एहसान खान (90) यांची प्रकृतीही चिंताजनक आहे. हॉस्पिटलच्या सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांना क्रिटिकल केअर युनिटमध्ये ठेवण्यात आले आहे. दोन्ही भावांना श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यामुळे त्यांना आर्टिफिशिअल ब्रिदिंग सपोर्टवर ठेवण्यात आले. 16 ऑगस्ट रोजी दोघांचेही कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते.

लीलावती हॉस्पिटलचे डॉ. जलील पारकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, असलम खान यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्याशिवाय त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोग होता. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

  • दिलीप कुमार आणि सायरा बानो सुखरुप

दिलीप कुमार यांचे दोन्ही भाऊ वेगळ्या घरात राहात होते. त्यामुळे दिलीप साहेब आणि सायरा बानो यांना कोरोनाचा संसर्ग झाला नाही. 97 वर्षीय दिलीप कुमार यांना घरी आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले असून ते सुखरुप आहेत.

असलम आणि एहसान यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर सायरा बानो यांनी वृत्त्ताला अधिकृत दुजोरा दिला होता. डॉक्टर जलील पारकर आणि हृदय रोग तज्ज्ञ नितीन गोखले त्यांच्यावर उपचार करत असल्याचे सायरा बानो यांनी सांगितले होते.

बातम्या आणखी आहेत...