आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात मोठी कारवाई करत प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते दिलीप ताहिल यांचा मुलगा ध्रुव ताहिलला अटक केली आहे. ध्रुवजवळून पोलिसांनी 35 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेल म्हणजे एएनसीने ही कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ध्रुव ताहिल हा मुजम्मिल अब्दुल रहमान शेख नावाच्या ड्रग पेडलरच्या संपर्कात होता. याला काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी अटक केली होती आणि चौकशी दरम्यान त्याने ध्रुव ताहिलला ड्रग्ज पुरविल्याची कबुली दिली होती.
अशा प्रकारे झाली ध्रुवला अटक
मुजम्मिल अब्दुल रहमान शेख याला अटक झाली तेव्हा पोलिसांनी त्याच्याकडू 35 ग्रॅम मेफड्रोन जप्त केले होते. यावेळी फोनही ताब्यात घेण्यात आला होता. यात ध्रुवने आरोपी मुजम्मिल अब्दुल रहमान शेख यांच्याशी ड्रग्स संबंधित चॅट केल्याचे समोर आले आहे. एएनआय वृत्तानुसार बुधवारी मुंबई क्राईम ब्रांचच्या अँटी नार्कोटिक्स सेलने ध्रुवला अटक केली.
ऑनलाईन मनी ट्रान्सफरचे पुरावेही सापडले
ध्रुव ताहिल 2019 पासून मार्च 2021 पर्यंत आरोपी मुजम्मिल अब्दुल रहमान शेखच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. ध्रुवच्या व्हाटस्अॅप चॅटवरून त्याने आरोपीशी ड्रग्ज घेण्यासाठी संपर्क केल्याचे कळते. तसेच ध्रुववर शेखच्या खात्यात सहा वेळा पैसै ट्रान्सफर केल्याचाही आरोप आहे. ध्रुवच्या अटकेबाबत दिलीप ताहिल यांची अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.