आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्यावर पार पडली यशस्वी शस्त्रक्रिया:महेश मांजरेकर मूत्राशयाच्या कर्करोगाने होते पीडित, आता यशस्वी शस्त्रक्रियेनंतर घरी परतले; प्रकृतीत होतेय सुधारणा

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महेश मांजरेकर यांच्यावर 10 दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते महेश मांजरेकर यांना काही दिवसांपूर्वी कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. आता बातमी आहे की, अलीकडेच त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. महेश मूत्राशयाच्या कर्करोगाने ग्रस्त होते. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर महेश आता घरी परतले असून हळूहळू त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

रिपोर्ट्सनुसार, महेश मांजरेकरांवर मूत्राशयाच्या कर्करोगावर 10 दिवसांपूर्वी मुंबईतील एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यानंतर ते काही दिवस रुग्णालयात होते. हॉस्पिटलच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, महेश यांच्यावर शस्त्रक्रिया अत्यंत सुरळीत पार पडली आहे. ते आता बरे होत असून रुग्णालयातून घरी परतले आहेत.

मराठी व्यतिरिक्त महेश यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये केले काम
महेश मांजरेकर यांनी 1992 मध्ये 'जिवा सखा' या मराठी चित्रपटातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. मराठी चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. 'प्लान', 'जिंदा', 'मुसाफिर', कांटे, 'दस कहानियां', 'वॉन्टेड', 'रेडी' आणि 'दबंग' अशा अनेक चित्रपटांमध्ये ते झळकले आहेत.

महेश मांजरेकर केवळ अभिनेतेच नाही तर दिग्दर्शकही आहेत. त्यांनी 'आई', 'वास्तव', 'निदान' आणि 'विरुध'सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. विशेष म्हणजे महेश एक उत्तम डान्सर देखील आहे, 2006 मध्ये 'झलक दिखला जा' या शोचे ते सेकंड रनरअप होते. 2018 मध्ये त्यांनी 'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या सीझनचे सूत्रसंचालनदेखील केले होते.

बातम्या आणखी आहेत...