आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रान्सफॉर्मेशननंतर फरदीनचा कमबॅक:म्हणाला - 12 वर्षांनंतर कॅमेऱ्यासमोर आलो तेव्हा खूप अस्वस्थ होतो, एका नवोदितासारखी अवस्था झाली होती

किरण जैन22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या 12 वर्षांत मी कॅमेरा खूप मिस केला.

फरदीन खानने आता 12 वर्षांनंतर चित्रपटात परतण्याचा निर्णय घेतला आहे. तो लवकरच ‘विस्फोट’ चित्रपटात दिसणार आहे. यासोबतच तो त्याच्या सर्वात लोकप्रिय फ्रँचायझी ‘नो एंट्री-2’मध्येही दिसणार आहे. आपल्या व्यावसायिक जीवनाशी संबंधित काही खास गोष्टी त्यांनी ‘दिव्य मराठी’सोबत शेअर केल्या.

  • 12 वर्षांनंतर ‘विस्फोट' मधून मोठ्या पडद्यावर तुम्ही कमबॅकबाबत किती उत्साहित आहेस?

बरेच. खरे सांगायचे तर, उत्तेजित होण्यापेक्षा जास्त अस्वस्थता असते. खरे सांगायचे तर मला बॉलिवूडमध्ये परतायचे होते, बॉलिवूडला अलविदा करण्याचा विचारही केला नव्हता. एवढ्या अंतरानंतर जेव्हा मी पुन्हा कॅमेऱ्याचा सामना केला तेव्हा मी खूप घाबरलो होतो हे मी नाकारणार नाही. त्यावेळी खूप भावूक झालो होतो. पण अभिनय ही एक गोष्ट आहे जी मला करायची होती आणि नेहमी करायची इच्छा आहे. आता मी माझ्या प्रेक्षकांना वचन देऊ इच्छितो की मी यापुढे बॉलिवूड सोडणार नाही. मला चित्रपटांद्वारे कथानक मांडण्याची प्रक्रिया आवडते आणि भविष्यातही या प्रक्रियेशी जोडलेला राहीन. एक नवोदितासारखे वाटत आहे.

  • संजय गुप्ता यांच्यासोबत कसा जुळला?

संजय (गुप्ता) आणि मी यापूर्वी एकमेकांसोबत काम केले आहे आणि इतक्या वर्षांनंतर आलो असतानाही माझा हृदयापासून स्वीकार केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानू इच्छितो. त्यांनी खूप साथ दिली. आम्ही खूप आनंद लुटला आहे. सहकार्याबद्दल बोलताना म्हटले, मी त्यांना आधी भेटायला बोलावले होते. इकडच्या-तिकडच्या गोष्टी केल्यानंतर त्यांनी मला ‘विस्फोट’बद्दल सांगितले. बोलता-बोलता त्यांनी मला या चित्रपटात येण्याबद्दल विचारले. त्यावेळी मी स्वत: अभिनयाकडे परतण्याचा विचार करत होतो, मग काय, लगेच संजयला होकार दिला.

  • अनिस बज्मीने सांगितले की, ते तुझ्यासोबत ‘नो एंट्री 2’ च्या सिक्वेलवर काम करणार आहेत, याबाबत काय म्हणणे आहे?

मी खरं तर त्यासाठी खूप उत्सुक आहे. मला तारखा इत्यादींबद्दल कोणतीही पुष्टी मिळालेली नाही; परंतु होय, हा एक प्रकल्प आहे ज्याबद्दल आम्ही सर्व उत्सुक आहोत. त्याचे नियोजन अनेक वर्षांपासून सुरू होते. मी चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकली आहे आणि मी तुम्हाला सांगतो की हा चित्रपट खूप मनोरंजक असेल आणि निश्चितच ही एक उत्तम टीम आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत पुन्हा काम करण्याची इच्छा होती. हे पूर्वीपेक्षा दुप्पट अधिक आशादायक आहे आणि यावेळी आनंद पातळी तीनपट वाढली आहे. त्याचबरोबर सलमान खानला भेटून बरेच महिने झाले आहेत. आम्ही फोनवर संपर्कात राहिलो पण त्यांना भेटण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे हो, त्याच्यासोबत काम करायला खूप उत्सुक आहे.

  • आपल्या ट्रान्सफॉर्मेशनबद्दल काही सांग.

फक्त पडद्यावर दिसायचे नाही तर वास्तविक जीवनातही शारीरिकदृष्ट्या 25 वर्षांचे वय अनुभवायचे होते, म्हणूनच पुन्हा कायापालट आवश्यक होते. मी सकस आणि निरोगी आहार घेण्यास सुरुवात केली, तसेच भरपूर व्यायामदेखील केला. मी गेल्या सहा महिन्यांत जवळजवळ 18 किलो वजन कमी केले आहे, आम्ही ज्या उद्योगात काम करतो त्या उद्योगात तुम्ही चांगले दिसावे अशी अपेक्षा असते आणि तुम्हाला खरोखरच सर्वोत्तम दिसायचे आहे. या लूकमुळे मी खूप खूश आहे.

  • अभिनयापासून लांब राहण्याचे काही कारण?

मी हे नाकारणार नाही की, या 12 वर्षांत मी कॅमेरा खूप मिस केला, मला अभिनय करायचा होता. तथापि, मीदेखील पूर्णवेळ पिता आहे, या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. एवढा मोठा ब्रेक घ्यायचा मी विचार केला नव्हता, पण माझ्या मुलांना सांभाळण्यात वेळ कुठे गेला ते कळलेच नाही.

बातम्या आणखी आहेत...