आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधन:अभिनेता मनोज बाजपेयीच्या वडिलांचे निधन, गेल्या अनेक दिवसांपासून होते आजारी; दिल्लीतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयी यांच्या वडिलांचे रविवारी सकाळी निधन झाले. राधाकांत बाजपेयी (85) गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. तसेच त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू होते. मधल्या काळात त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देखील मिळाला होता. परंतु, प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करावे लागेल.

शूटिंग सोडून आला होता अभिनेता

केरळमध्ये शूटिंग करताना मनोज बाजपेयी यांना आपल्या वडिलांची प्रकृती अचानक बिघडल्याचे वृत्त मिळाले होते. त्यानंतर ते शूटिंग सोडून आपल्या वडिलांना भेटण्यासाठी निघाले होते.

मनोज बाजपेयीच्या वडिलांचे निधन झाल्याच्या वृत्ताला दिग्दर्शक अविनाश दास यांनी ट्विट करून दुजोरा दिला आहे. यासंदर्भात त्यांनी एक भावूक पोस्ट केली आहे.

वडिलांमुळेच पदवी घेतली

गेल्या काही महिन्यांपासून राधाकांत बाजपेयी रुग्णालयातच होते. या दरम्यान अनेकदा त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि स्थिर सुद्धा झाली. राधाकांत यांना तीन मुले आहेत. त्यापैकीच अभिनेता मनोज बाजपेयी सर्वात ज्येष्ठ आहे. पश्चिम चंपारणच्या एका छोट्या गावातून मुंबईपर्यंत पोहोचविण्यात त्यांच्या वडिलांचा मोठा हातभार होता. एका मुलाखतीमध्ये मनोज बाजपेयींनी म्हटले होते की त्यांच्या वडिलांनी नेहमीच शिक्षणावर भर देण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यामुळे वयाच्या 18 व्या वर्षी गाव सोडून दिल्लीला गेलो आणि पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

बातम्या आणखी आहेत...