आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सलमान खानच्या गाजलेल्या 'बजरंगी भाईजान’ या चित्रपटात झळकलेले अभिनेते हरीश बंचता यांचे कोरोनामुळे निधन झाल्याचे वृत्त आहे. हरीश हिमाचलमध्ये आपल्या कुटुंबासोबत असताना त्यांचा कोरोनाची लागण झाली. यातच मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. ते 48 वर्षांचे होते.
मुळचे शिमलाचे असलेले हरीश गेल्या 18 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय होते. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी स्वत:ची एक ओळख निर्माण केली होती. त्यांनी बॉलिवूडमधील बर्याच चित्रपटांमध्ये काम केले. मात्र बजरंगी भाईजानमधील त्यांच्या भुमिकेचे विशेष कौतुक झाले होते. या चित्रपटात त्यांनी पाकिस्तानी पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती.
एक दिवसआधी झाले होते आईचे निधन
एका दिवसाआधीच त्यांच्या आईचा मृत्यू झाला होता. त्यामुळे लागोपाठ माय-लेकाच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हरीश यांना ताप आल्यामुळे रोहडूहून आयजीएमसी येथे हलविण्यात आले होते. सोमवारी रात्री त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मंगळवारी संध्याकाळी कोरोना प्रोटोकॉलमध्ये कनालॉग या त्यांच्या गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना एक मुलगी असून ती नववीत शिकत आहे.
अनेक टीव्ही मालिकांमध्येही केले काम
हरीश यांनी ब-याच टीव्ही मालिकांमध्येही काम केले. त्यांनी सीआयडी आणि क्राइम पेट्रोलमध्येही अभिनय केला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.