आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेडिंग बेल्स:21 मार्च रोजी कोलकातामध्ये लग्नाच्या बेडीत अडकणार 40 वर्षीय हरमन बावेजा, जाणून घ्या कोण आहे त्याची होणारी पत्नी

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 40 वर्षीय हरमन हा चित्रपट निर्माता हॅरी बावेजांचा मुलगा आहे.

'लव्ह स्टोरी 2050' आणि 'व्हॉट्स योर राशी' यासारख्या चित्रपटांमध्ये झळकलेला अभिनेता हरमन बावेजा येत्या मार्च महिन्यात लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. 40 वर्षीय हरमन बावेजा येत्या 21 मार्च रोजी न्यूट्रिशन हेल्थ कोच साशा रामचंदानीसोबत लग्न करणार आहे. कोलकातामध्ये हा लग्नसोहळा पार पडणार आहे.

हरमनचे वडील आणि निर्माते हॅरी बावेजा यांनी लग्नाची तारीख निश्चित केली आहे. त्यांच्या लग्नात फिल्म इंडस्ट्रीतील निवडक लोक सामील होणार आहेत. दोन्ही कुटुंबांमध्ये लग्नाची तयारी सुरु झाली आहे. हरमनने 50-70 पाहुण्यांची यादी तयार केली आहे. लग्नानंतर मुंबईत वेडिंग रिसेप्शन होणार की नाही, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

डिसेंबर महिन्यात झाला होता साखरपुडा झाला
हरमन आणि साशा यांचा डिसेंबर महिन्यात साखरपुडा झाला होता. साशाची मैत्रीण आणि क्रिकेटपटू झहीर खानची पत्नी अभिनेत्री सागरिका घाटगे हिने सोशल मीडियावर ही माहिती दिली होती. तिने सोशल मीडिया स्टोरीमध्ये हरमन आणि साशाचा फोटो शेअर करुन 'साशा आणि हरमन तुम्हाला खूप खूप शुभेच्छा' असे कॅप्शन दिले होते.

हॅरी बावेजांचा मुलगा आहे हरमन
हरमन हा चित्रपट निर्माते हॅरी बावेजांचा मुलगा आहे. त्याने 2008 मध्ये 'लव्ह स्टोरी 2050' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता, ज्यामध्ये प्रियंका चोप्रा त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत झळकली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. यानंतर त्याचा 'विक्ट्री', 'व्हॉट्स योर राशी' आणि 'ढिशक्यांऊं' हे चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकले नाहीत. यावर्षी, त्याचा आणि जेनेलिया देशमुख स्टारर 'इट्स माय लाइफ' टीव्हीवर रिलीज झाला होता, ज्याचे शूटिंग जवळपास दशकभरापूर्वी झाले होते.

वजन वाढल्यामुळे चर्चेत राहिला
हृतिक रोशनच्या लूक अ लाइक म्हणून ओळखल्या जाणार्‍या हरमन बावेजाने 'ढिशक्यांऊं' नंतर कोणत्याही चित्रपटात काम केले नाही. वजन वाढल्यामुळे तो चर्चेत राहिला होता. लठ्ठ झालेल्या हरमनला लोक ओळखू शकले नव्हते.

बातम्या आणखी आहेत...