आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इम्रान खानचा अभिनयाला रामराम:अभिनेता आमिर खानच्या भाच्याने घेतला अभिनयातून संन्यास, आता ही वाट चोखाळणार

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इम्रानने आपल्या अभिनय करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती.

अभिनेता आमिर खानचा भाचा आणि देल्ली बेली, जाने तू या जाने ना सारख्या चित्रपटांमध्ये झळकलेला अभिनेता इम्रान खानने अभिनयाला पूर्ण विराम देण्याचा निर्णय घेतला आहे. इम्रानचा जवळचा मित्र आणि अभिनेता अक्षय ओबेरॉयने एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गेल्या 18 वर्षांपासून इम्रान आणि अक्षय एकमेकांना ओळखतात.

अक्षयने मुलाखतीत सांगितले की, माझा सर्वात जवळचा मित्र इम्रान खान आता अभिनेता म्हणून काम करणार नाही. त्याने अभिनय सोडला आहे. इम्रान अभिनय सोडून दिग्दर्शनात पाऊल टाकेल अशी आशा असल्याचेही तो म्हणाला आहे.

अक्षय पुढे म्हणाला की, इम्रानला चित्रपटांबद्दल चांगली समज आहे. अशा परिस्थितीत तो स्वतः एखाद्या चित्रपटाचे दिग्दर्शन करू शकतो. तो पडद्यावर नक्कीच धमाका करेल.

इम्रानने आपल्या अभिनय करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. ‘कयामत से कयामत तक’ (1988) या चित्रपटात त्याने आमिरच्या लहानपणीची भूमिका साकारली होती. याशिवाय‘जो जिता वही सिकंदर’ (1992) मध्येही झळकला होता. 2008 मध्ये 'जाने तू या जाने ना' या चित्रपटातून त्याने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते. अखेरचा तो 'कट्टी बट्टी' या चित्रपटात दिसला होता. याशिवाय इम्रानने ‘देल्ली बेल्ली’, 'किडनॅप', 'लक', 'आय हेट लव्ह स्टोरी' अशा चित्रपटांमध्ये काम केले आहे.

बातम्या आणखी आहेत...