आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

लॉकडाऊनचा परिणाम:आमिर खानसोबत झळकलेल्या अभिनेत्यावर आली भाजी विकायची वेळ, लॉकडाऊनमुळे झाला बेरोजगार 

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सध्या जावेदचा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होतोय.

80 आणि 90 च्या दशकात चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम करणारा अभिनेता जावेद हैदरवर लॉकडाऊनने खूप वाईट वेळ आणली आहे. काम नसल्यामुळे जावेदवर भाजी विक्री करायची वेळ आली आहे. ली बिंद्राने जेव्हा आपल्या ट्विटर हँडलवर त्याचा व्हिडिओ शेअर केला जावेदची हलाखीची परिस्थिती उघडकीस आली. टिकटॉकवर बनवलेल्या या व्हिडिओमध्ये जावेद काम करताना, 'दुनिया में रहना है तो काम कर प्यारे' या गाण्यावर लिप सिंक करताना भाजी विकताना दिसत आहे.

डॉली बिंद्राने जावेदचा व्हिडिओ शेअर करुन लिहिले,  ‘हा अभिनेता आहे. तो भाजी विकत आहे. त्याचे नाव जावेद हैदर आहे’ असे म्हटले आहे.

अनेक कलाकारांवर आली वाईट वेळ

लॉकडाऊनच्या काळात अनेक कलाकारांवर काम नसल्याने वाईट वेळ आली आहे. यापूर्वी राजेश करीर यांनीही एक भावनिक व्हिडिओ शेअर करुन मदतीची विनंती केली होती. व्हिडिओ व्हायरल होताच राजेशला आर्थिक मदत मिळाली होती. 19 मार्चपासून बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीत शूटिंग बंद झाल्यामुळे जावेद हैदरदेखील याच परिस्थितीतून जातोय. आता मात्र महाराष्ट्र सरकार आणि चित्रपटाच्या संघटनांनी शूटिंग संबंधित मार्गदर्शक सूचना जाहीर केल्यानंतर हळूहळू चित्रीकरणआला सुरुवात होत आहे.

जावेदने बाल कलाकार म्हणून 'बाप नंबरी बेटा दस नंबरी'  या चित्रपटात कादर खान यांच्या मुलाची भूमिका साकारली होती. याशिवाय तो आमिर खानच्या 'गुलाम' या चित्रपटात झळकला होता. बाबर आणि चांदनी बार या चित्रपटांमध्येही त्याने काम केले. टीव्हीवरील 'जीनी और जू जू' आणि 'लाइफ की ऐसी की तैसी' या मालिकांमध्येही तो दिसला होता.