आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाचा परिणाम:जॉन अब्राहम स्टारर 'सत्यमेव जयते 2'चे प्रदर्शन पुन्हा पडले लांबणीवर, ईदच्या मुहूर्तावर सलमान खानच्या 'राधे'सोबतची टक्कर टळली

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • निर्माते म्हणाले- लोकांची सुरक्षा आणि आरोग्य अधिक महत्वाचे आहे

देशात कोरोनाच्या दुस-या लाटेच्या उद्रेकामुळे गेल्या काही दिवसांत ब-याच चित्रपटांची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता अभिनेता जॉन अब्राहम स्टारर 'सत्यमेव जयते 2'ची रिलीज डेटही पुढे ढकलण्यात आली आहे. निर्मात्यांनी मंगळवारी सोशल मीडियावर एक निवेदन प्रसिद्ध करुन चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर टाकल्याचे सांगितले आहे. पण त्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवीन तारीख जाहीर केलेली नाही.

जॉनचा हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर म्हणजे 13 मे रोजी प्रदर्शित होणार होता. या चित्रपटाची टक्कर सलमान खानच्या 'राधे: योर मोस्ट वाँटेड भाई'सोबत होणार होती. मात्र आता प्रदर्शन लांबणीवर पडल्याने जॉन आणि सलमानची बॉक्स ऑफिसरवची टक्कर टळली आहे. दुसरीकडे 'राधे' मात्र ठरलेल्या दिवशीच म्हणजे ईदच्या दिवशीच थिएटर आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

लोकांची सुरक्षा आणि आरोग्य अधिक महत्वाचे आहे
निर्मात्यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे, ‘या संकटाच्या वेळी आम्ही लोकांच्या सुरक्षेची आणि आरोग्याची काळजी घेत आपल्या आगामी ‘सत्यमेव जयते 2′ चित्रपटाची तारीख ठरवलेल्या दिवसापासून पुढे ढकलत आहोत. आम्ही आपल्याला चित्रपटाशी संबंधित अधिक माहिती देत ​​राहू. तोपर्यंत सुरक्षित अंतर ठेवा आणि मास्क घाला, स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या, जय हिंद!’

यापूर्वीही कोरोनामुळे चित्रपटाचे प्रदर्शन बर्‍याच वेळा पुढे ढकलण्यात आले
मिलाप झवेरी दिग्दर्शित 'सत्यमेव जयते 2' या चित्रपटात जॉन व्यतिरिक्त दिव्या कुमार खोसला मुख्य भूमिकेत आहे. जॉनसोबतच अभिनेता मनोज बाजपेयीदेखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय अनूप सोनी, हर्ष छाया हेदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. भूषण कुमार, कृष्णा कुमार (टी-सीरिज), मोनिशा अडवाणी, मधु भोजवानी, निखिल अडवाणी (एमे एंटरटेन्मेंट) यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट 2018 मध्ये रिलीज झालेल्या 'सत्यमेव जयते' या चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटाचे प्रदर्शन यापूर्वी अनेक वेळा कोरोना आणि लॉकडाऊनमुळे पुढे ढकलले गेले आहे.

'सत्यमेव जयते 2' मध्ये जॉनची दुहेरी भूमिका
'सत्यमेव जयते 2' मध्ये जॉन अब्राहमची दुहेरी भूमिका आहे. एका भूमिकेत तो एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून दिसणार आहे. त्याचवेळी, दुसर्‍या भूमिकेत तो शत्रूंचा नायनाट करताना दिसणार आहे. अशा प्रकारे जॉन सत्याग्रह आणि हिंसा या दोन्ही द्वारे भ्रष्टाचा-यांना धडा शिकवणार आहे. चित्रपटात जॉनचा अ‍ॅक्शन अवतार बघायला मिळणार आहे.

10-12 किलो वजन कमी केले
जॉनने या चित्रपटासाठी लीन फिजिक ठेवले आहे. यासाठी त्याने त्याचे वजन 10 ते 12 किलोपर्यंत कमी केले आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात जॉनने ट्रकचा टायर फाडला होता. तर आता दुस-या भागात तो ट्रक आणि ट्रॅक्टरसोबत अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. चित्रपटात तो 50 गुंडांसोबत एकटा लढताना दिसेल.

बातम्या आणखी आहेत...