आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रेलर रिलीज:ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'धमाका' करण्यासाठी अभिनेता कार्तिक आर्यन सज्ज, चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ट्रेलरमध्ये मुंबईत झालेला बॉम्ब स्फोट आणि त्यानंतर कार्तिक आर्यनचे हादरुन गेलेले आयुष्य पाहायला मिळतंय.

अभिनेता कार्तिक आर्यनच्या आगामी 'धमाका' या चित्रपटाचा ट्रेलर अलीकडेच रिलीज झाला आहे. या चित्रपटातून कार्तिक पत्रकार अर्जुन पाठकच्या रूपात डिजिटल विश्वात धमाका करताना दिसणार आहे. राम माधवानी दिग्दर्शित या चित्रपटातील कार्तिकच्या ट्रांसफॉर्मेशनने चाहत्यांना थक्क केले आहे. ट्रेलरमध्ये मुंबईत झालेला बॉम्ब स्फोट आणि त्यानंतर कार्तिक आर्यनचे हादरुन गेलेले आयुष्य पाहायला मिळतंय.

ट्रेलरमध्ये एका फोन कॉलने अर्जुन पाठकच्या आयुष्यात काही तासात आलेले वादळ पाहायला मिळत आहे. रघुवीर नावाचा एक व्यक्ती फोन करून त्याला सीलिंक उडवण्याची माहिती देतो आणि दुसऱ्या सेकंदाला तसे घडतेदेखील. यानंतर कार्तिक चॅनलला फोन करणाऱ्या या व्यक्तीची मुलखात लाइव्ह करण्याचा सल्ला देतो. अभिनेत्री मृणाल ठाकूर या चित्रपटात कार्तिकच्या पत्नीची आणि एका पत्रकाराची भूमिका साकारतेय. तर अभिनेत्री अमृता सुभाषने देखील चित्रपटात महत्त्वाची भूमिका वठवली आहे. हा चित्रपट येत्या 19 नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज होतोय.

बातम्या आणखी आहेत...