आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फनी व्हिडिओ:मदर्स डेच्या निमित्ताने सेल्फी शेअर करण्यासाठी कार्तिक आर्यन आईकडे मागितले पैसे, तर आई म्हणाली....

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कार्तिकला त्याच्या आईकडून एक चोख उत्तर मिळते.

कार्तिक आर्यन आपल्या मजेदार सोशल मीडिया पोस्टसाठी ओळखला जातो. मदर्स डेच्या निमित्ताने आई माला तिवारीसोबतचा एक मजेदार व्हिडिओ त्याने शेअर केला. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करताना कार्तिकने कॅप्शन दिले- आईचे प्रेम.

व्हिडिओमध्ये, कार्तिक  कॅमेरा सेट करताना दिसतोय, त्याचवेळी बॅकग्राऊंडला त्याची आई त्याला हाक मारते आणि म्हणते, सर्व सेलिब्रिटींनी त्यांच्या आईबरोबरचा सेल्फी शेअर केला आहे परंतु तू एकही केला नाही. भोपाळच्या आत्याने दोनदा फोन करून विचारणा केली आहे. त्याला उत्तर देताना कार्तिक म्हणतो, आई  प्रत्येक पोस्ट शेअर करण्यासाठी मला किती लाख रुपये मिळतात हे तुला माहिती आहे का, तू मला ते देणार आहे का? कार्तिकला यावर त्याच्या आईकडून एक चोख उत्तर मिळते. एक चापट हवी आहे का, असे त्याची आई त्याला म्हणते, त्यावर कार्तिकला हसू येतं.

View this post on Instagram

Maa ki Mamta ❤️

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan) on May 10, 2020 at 8:49am PDT

सेलिब्रिटींनी देखील पाय खेचला: हा व्हिडिओ व्हायरल होण्यास जास्त वेळ लागला नाही. याला 12 तासांत 2.25 मिलियन व्ह्यूज मिळाली. तसेच, व्हिडिओ पाहून कार्तिकच्या इंडस्ट्रीतील त्याच्या सहका-यांनीदेखील त्याचा पाय खेचण्यास सुरुवात केली. भूमीने आपल्या कमेंटमध्ये लिहिले- मी एक किक देईन, ज्यावर कार्तिक म्हणाला, मला वाटले की ती लाख म्हणत आहे. तसेच, यासोबत त्याने एक रडणारी स्माईलीही शेअर केली. तसेच अर्जुननेही कार्तिकची खिल्ली उडवली. 

बातम्या आणखी आहेत...