आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुड न्यूज:किरण कुमार यांची तिसरी कोरोना चाचणी आली निगेटिव्ह, 14 मेपासून स्वत:ला ठेवले क्वारंटाईन; सांगितला कोरोनावर मात करण्याचा अनुभव 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • किरण कुमार यांची 14 मे रोजी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती.

ज्येष्ठ अभिनेते किरण कुमार यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांची दुसरी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. पण आता दिलासादायक बातमी म्हणजे त्यांनी कोरोनावर मात केली असून त्यांची तिसरी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. या वृत्तामुळे त्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे. 14 मे रोजी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी स्वतःला क्वारंटाईन केले होते. पण हा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरदेखील ते आणि त्यांचे संपूर्ण कुटुंबीय सध्या आयसोलेशनमध्ये राहणार आहेत.

किरण दोन आठवड्यांपूर्वी रूटीन तपासणीसाठी रूग्णालयात गेले असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजले होते.  त्यावेळी हॉस्पिटल व्यवस्थापनाने खबरदारी घेत इतर चाचण्यांसह त्यांची कोरोनाची चाचणीही केली होती.

  • किरण म्हणाले - मला कोणतेही लक्षण जाणवत नव्हते

कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर किरण यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, 'मला कोणतेही लक्षण जाणवत नव्हते. खोकला नव्हता, ताप नव्हता. श्वसनाची समस्या नव्हती. मी निरोगी होतो. म्हणून मी स्वत:हून कोरोनाची चाचणी करुन घेतली नव्हती. म्हणून मला रुग्णालयातही दाखल केले नाही.

  • घरात दोन मजले असल्यामुळे कोणतीही अडचण आली नाही

किरण यांचे घर मोठे असून त्यांच्या घरात दोन मजले आहेत. ते म्हणाले, 'कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे कळताच आम्ही काही तासांमध्ये घराच्या एका मजल्याचे आयसोलेशन वॉर्डात रुपांतर केले. माझ्या घरात दोन मजले आहेत, त्यामुळे आम्हाला जागेची कोणतीही समस्या नव्हती. माझी पत्नी आणि मुले पहिल्या मजल्यावर राहतात आणि मी स्वतःला वरच्या मजल्यावर आयसोलेट केले.'

  • आज आनंद होतोय

किरण म्हणाले, ‘हिंदुजा आणि लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी आम्ही घाबरु नये म्हणून खूप मदत केली. आम्ही याबाबत बीएमसीला माहिती दिली. आज माझी करोना चाचणी करण्यात आली आणि ती निगेटिव्ह आल्याचे सांगताना मला आनंद होत आहे.' 

  • घरगुती उपचारही केलेत

कोरोनावर मात करण्यासाठी किरण यांनी घरगुती उपचार म्हणून हळदीचा वापर केला होता. तसेच त्यांनी स्वत: ला क्वारंटाइन केल्यानंतर मेडीटेशन केले होते. वेब सीरिज पाहिल्या, पुस्तके वाचली होती.

  • डॉक्टरांचे मानले आभार

किरण यांनी त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि इतर सदस्यांचे आभार मानले आहेत. तसेच त्यांनी लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने खचून न जाता सकारत्मक राहण्याचा सल्ला दिला आहे. 

  • अनेक सेलिब्रिटींना झाला संसर्ग

यापूर्वी बॉलिवूड गायिक कनिका कपूर, चित्रपट निर्माते करीम मोरानी आणि त्यांच्या दोन मुली, अभिनेता पूरब कोहली, अभिनेता फ्रेडी दारूवालाचे वडील, अभिनेता सत्यजित दुबेच्या आईसह बोनी कपूर, करण जोहर आणि फराह अली खानच्या घरातील काम करणा-या सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती.  

बातम्या आणखी आहेत...