आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दुःखद:अभिनेत्री आणि मॉडेल दिव्या चौकसेचे कर्करोगाने निधन, शेवटचे शब्द- मी मृत्यू शय्येवर आहे, कृपया कोणतेही प्रश्न विचारू नका

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 12 जुलै रोजी दिव्याने या जगाचा निरोप घेतला.

2020 हे वर्ष बॉलिवूडसाठी फारसे चांगले नाही. अनेक कलाकारांनी या वर्षात जगाचा कायमचा निरोप घेतला आहे. आता बॉलिवूड अभिनेत्री, मॉडेल आणि गायिका दिव्या चौकसेचे निधन झाल्याचे वृत्त आहे. गेल्या काही दिवसांपासून ती कर्करोगाशी झुंज देत होती. दिव्याची चुलत बहीण सौम्या अमीष वर्माने फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली. 

‘मला तुम्हाला सांगताना दु:ख होत आहे की, माझी चुलत बहीण दिव्या चौकसेचा कर्करोगामुळे मृत्यू झाला आहे. तिने 12 जुलै रोजी जगाचा निरोप घेतला. तिने लंडनला जाऊन अभिनयाचे धडे घेतले होते. ती एक चांगली मॉडेल होती. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच मालिकांमध्येही काम केले आहे’ असे सौम्याने आपल्या पोस्टमध्ये सांगितले आहे. 

दिव्याच्या चुलत बहिणीची फेसबुक पोस्ट
  • दिव्याचे शेवटचे शब्द

निधनाच्या 18 तासांपूर्वी दिव्याने  इंस्टाग्राम स्टोरीवर एक मेसेजही लिहिला होता. दिव्याने तिच्या शेवटच्या मेसेजमध्ये लिहिले होते - मला जे सांगायचे आहे त्यासाठी शब्द पुरेसे नाहीत. जरी खूप शब्द आहेत परंतु ते कमी आहेत. मी गेल्या काही महिन्यांपासून तुमच्या संपर्कात नाही, आणि भरपूर संदेश मला मिळाले आहेत. मी माझ्या मृत्यू शय्येवर आहे, हे मी तुम्हाला सांगू इच्छिते. मी स्वतःला सशक्त केले आहे, अशा आयुष्यासाठी जिथे संघर्ष नाही. कृपया कोणतेही प्रश्न विचारू नका. तुम्ही माझ्यासाठी किती महत्त्वाचे आहाता, हे फक्त देवालाच ठाऊक आहे', हे दिव्याचे शेवटचे शब्द ठरले. 

दिव्याची शेवटची पोस्ट

दिव्याने 2011 मध्ये मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभाग घेतला होता. 2016 मध्ये ‘अपना दिल तो आवारा’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. तर 2018 मध्ये, तिने 'पटियाले दी क्वीन' या गाण्याद्वारे सिंगिंग डेब्यू केला होता. दिव्याच्या निधनाची बातमी समजताच तिच्यासोबत काम केलेल्या कलाकारांनी तिला श्रद्धांजली वाहिली आहे. यामध्ये साहिल अहमद, अंजुम फाकिह, निहारिका रायजादा यांच्या नावाचा समावेश आहे. 

दिव्या भोपाळच्या अॅडव्होकेट कुटुंबाशी संबंधित होती. तिचे शालेय शिक्षण भोपाळ येथे झाले होते. यानंतर तिने दिल्लीतून ग्रॅज्युएशन केले होते. लंडनमधील बेडफोर्डशायर विद्यापीठातून दिव्याने अभिनयाचा कोर्स केला होता. दिग्दर्शक मंजोय मुखर्जीने दिलेल्या माहितीनुसार गेल्या दीड वर्षांपासून दिव्या कर्करोगीशी झुंज देत होती. भोपाळ येथे तिने अखेरचा श्वास घेतला. 

0