आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुःखद:अभिनेता मोहित बघेलचे कर्करोगाने निधन, सलमानच्या 'रेडी'मध्ये साकारली होती ‘छोटे अमर चौधरी’ची भूमिका 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोहित फक्त 27 वर्षांचा होता. कर्करोगाशी त्याची झुंज संपली आणि त्याने अखेरचा श्वास घेतला.

'छोटे मियाँ' या कॉमेडी रिअॅलिटी शोमधून प्रसिद्ध झालेला अभिनेता मोहित बघेलचे निधन झाले आहे. शनिवारी वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी त्याने या जगाचा कायमचा निरोप घेतला. कर्करोगामुळे त्याचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ या शोचे दिग्दर्शक राज शांडिल्य यांनी ट्विट करुन मोहितच्या निधनाची बातमी दिली.

राज शांडिल्य यांनी केले ट्विट 

मोहित, माझ्या भावा जायची एवढी घाई का केलीस? मी तुला सांगितले होते की, पूर्ण इंडस्ट्री तुझ्यासाठी थांबली आहे, तू लवकरात लवकर बरे होऊन परते ये नंतरच काम सुरु करु, असे मी तुला सांगितले होते. तू खूप चांगला अभिनय करतोस म्हणून मी पुढच्या चित्रपटाच्या सेटवर तुझी प्रतीक्षा करेन... आणि तुला यावंच लागेल... अशा शब्दांत राज यांनी मोहितला श्रद्धांजली वाहिली. 

अभिनेत्री परिणीती चोप्रानेही राज यांचे ट्विट रिट्विट करत मोहितला श्रद्धांजली वाहिली. परिणीती आणि सिद्धार्थ मल्होत्रासोबत जबरिया जोडी या चित्रपटात मोहितने काम केले होते. 

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रानेही आपले दुःख व्यक्त केले आहे.  

मोहित लहानपणापासून कर्करोगग्रस्त होता. अखेरच्या काही दिवसांमध्ये तो नोएडा येथील रुग्णालयात उपचार घेत होता. परंतु कर्करोगाचा प्रभाव वाढल्यामुळे त्याचा जीव वाचवण्यात डॉक्टर अपयशी ठरले.

मोहितचा जन्म उत्तर प्रदेशमधील एका गरीब कुटुंबात झाला होता. अभिनेता होण्यासाठी तो मुंबईत आला. त्याने ‘छोटे मिया’ या कॉमेडी शोमधून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. त्यानंतर त्याला सलमान खानच्या ‘रेडी’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटात त्याने ‘छोटे अमर चौधरी’ ही भूमिका साकारली होती. 

मोहितने दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया यांच्या मिलन टॉकीजमध्ये काम केले होते. यामध्ये अली फजल त्याच्यासोबत होता.

मोहितने काही दिवसांपूर्वीच यशराज बॅनरच्या 'बंटी और बबली 2' मध्येही काम करणार असल्याचे सांगितले होते. पण त्यापूर्वीच तो हे जग सोडून कायमचा निघून गेला आहे. 

बातम्या आणखी आहेत...