आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बरे होत आहेत प्रकाश राज:अभिनेते प्रकाश राज यांच्या खांद्यावर पार पडली यशस्वी शस्त्रक्रिया, फोटो शेअर करत म्हणाले - 'लवकरच पुन्हा एकदा अ‍ॅक्शनमध्ये परतेल'

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रकाश राज यांनी शस्त्रक्रियेनंतरचा एक फोटो शेअर करत त्यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती दिली आहे.

बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांचा अपघात झाला होता. स्वतः प्रकाश राज यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही माहिती दिली होती. या अपघातात त्यांच्या खांद्याला फ्रॅक्चर झाले होते आणि बुधवारी त्यांच्यावर एक छोटी शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी स्वतः सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून दिली होती. सोबतच माझ्यासाठी प्रार्थना करा, असेही त्यांनी चाहत्यांना म्हटले होते. आता प्रकाश राज यांनी शस्त्रक्रियेनंतरचा एक फोटो शेअर करत त्यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती दिली आहे.

प्रकाश राज यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत शस्त्रक्रियेनंतरचा फोटो देखील शेअर केला आहे. या फोटोत त्यांच्या खांद्याला पट्टी लावलेली दिसत आहे. त्यांनी शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांचे आभार मानले आहेत. त्यांनी लिहिले, 'डेव्हिल इज बॅक… शस्त्रक्रिया यशस्वी… मित्र डॉ. गुरूवा रेड्डी यांचे खूप खूप आभार…माझ्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार. लवकरच पुन्हा एकदा अ‍ॅक्शनमध्ये परतेल,' असे ते म्हणाले आहेत.

बुधवारी काय म्हणाले होते प्रकाश राज?
प्रकाश राज यांनी बुधवारी केलेल्या पोस्टमध्ये त्यांच्यावर हैदराबाद येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत उपचारांसाठी त्यांचे डॉक्टर मित्र डॉ. गुरुदेवा रेड्डी यांच्याकडे हैदराबादला जात असल्याचे सांगितले होते. त्यांनी लिहिले होते, 'मी पडलो आहे. त्यामध्ये एक छोटेसे फ्रॅक्चर झाले आहे. आता मी हैदराबाद येथील माझे डॉक्टर मित्र डॉ. गुरुदेवा रेड्डी यांच्याकडे जात आहे. ते माझ्यावर शस्त्रक्रिया करणार आहेत. मी लवकरच बरा होईल, काळजी करण्याचे काही कारण नाही. माझ्यासाठी प्रार्थना करा,' असे ते म्हणाले होते.

प्रकाश राज यांच्या या पोस्टनंतर त्यांचे चाहते त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत. प्रकाश राज यांचे सहकलाकार अभिनेता आणि निर्माता बंधाल गणेश आणि नवीन मोहम्मदी यांनी देखील त्यांच्या तब्येतीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रकाश राज यांनी सलमान खान स्टारर 2009 मध्ये रिलीज झालेल्या 'वाँटेड' चित्रपटात गनी भाईची भूमिका साकारली होती. त्याच्या अभिनयाचे त्यावेळी खूप कौतुक झाले होते. त्यानंतर त्यांनी 'सिंघम'मध्ये जयकांत शिकरे ही खलनायकी भूमिका साकारली. त्यांची ही भूमिका एवढी लोकप्रिय झाली की आज अनेक लोक त्यांना या नावने ओळखतात. या भूमिकेसाठी त्यांनी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला होता. याशिवाय त्यांनी 'दबंग', 'बुड्ढा होगा तेरा बाप', 'भाग मिल्खा भाग' या बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. तर आता त्यांचे ‘केजीएफ 2’, ‘पोन्नीयन सेल्वम’, ‘पुष्पा’ हे चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहेत.

बातम्या आणखी आहेत...