आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्मी ट्रेनिंग सोडून मुंबईला आले होते प्रेम नाथ:चित्रपट फ्लॉप झाल्यावर बनले संन्यासी, वाचा, संपूर्ण जीवन कहाणी

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेम नाथ… एक असे अभिनेता ज्याने नायक बनण्याचे स्वप्ने पाहिले होते, परंतु नशिबाने त्याला चित्रपट जगतातील सर्वोत्तम खलनायक बनवले. पेशावरमध्ये जन्मलेले प्रेम नाथ भारत-पाकिस्तान फाळणीनंतर मध्य प्रदेशात स्थायिक झाले. त्यांचे वडील पोलिस खात्यात असताना त्यांनी प्रेम नाथ यांना सैन्यात भरती करून घेतले. पण प्रेम नाथ यांना अभिनयाची आवड इतकी होती की ते तेथून निघून गेले आणि स्वप्नांच्या नगरी मुंबई त्यांनी गाठली.

मुंबईला जाऊन ते पृथ्वी थिएटरशी जोडले गेले आणि आपल्या चित्रपट कारकिर्दीला त्यांनी सुरुवात केली. पहिला चित्रपट यशस्वी झाल्यावर तर चित्रपटांचा प्रवास वाढतच गेला. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ते अभिनेत्री बिना रायच्या प्रेमात पडले आणि त्यांच्याशी त्यांनी लग्न केले. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात सर्व काही ठीक चालले होते, परंतु त्यांच्या व्यावसायिक जीवनात समस्या येऊ लागल्या. जिथे एकीकडे बिना राय यशाच्या पायऱ्या चढत होत्या, तर दुसरीकडे प्रेम नाथ स्वतःला नायक म्हणून स्थापित करण्यात अपयशी ठरत होते.

चित्रपटातील अपयशामुळे प्रेम नाथ इतके हताश झाले होते की ते काही वर्षे चित्रपट जगतापासून दुरावले. या दरम्यान त्यांनी संन्याशासारखे जीवन जगण्यास सुरुवात केली. काही वर्षांनी प्रेम नाथ यांनी चित्रपटांमध्ये पुनरागमन केले. मात्र यावेळी नायक म्हणून नव्हे तर खलनायकाच्या भूमिकेतून. कारकिर्दीतील दुसऱ्या डावात त्यांना फक्त आणि फक्त यश मिळाले. जानी दुश्मन सारख्या चित्रपटात प्रेम नाथ यांनी सर्वोत्तम पद्धतीने खलनायकाची भूमिका साकारत खलनायकाची नवी व्याख्या रूढ केली.

आज प्रेम नाथ यांच्या जयंतीनिमित्त वाचा, त्यांच्या जीवनाशी संबंधित काही न ऐकलेल्या रंजक गोष्टी-

चित्रपटात काम मागण्यासाठी लहानपणी पृथ्वीराज कपूर यांना पत्र लिहायचे

प्रेम नाथ मल्होत्रा ​​यांचा जन्म 21 नोव्हेंबर 1926 रोजी पेशावर येथे झाला. भारत-पाकिस्तानची फाळणी झाली तेव्हा त्यांचे कुटुंब मध्य प्रदेशातील जबलपूर येथे स्थायिक झाले. प्रेम नाथ यांना लहानपणापासूनच चित्रपटांची खूप आवड होती आणि ते पृथ्वीराज कपूर यांचेही ते मोठे चाहते होते. यामुळेच ते अनेकदा पृथ्वीराज कपूर यांना चित्रपटात काम मिळण्यासाठी पत्रे लिहायचे.

प्रेम नाथचे वडील पोलिस खात्यात इन्स्पेक्टर होते. आपल्या मुलानेही देशसेवा करावी, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती, म्हणून त्यांनी प्रेम नाथ यांना सैन्यात भरती केले.

तिथे गेल्यावरही प्रेम नाथांचे मन चित्रपटांमध्येच तल्लीन राहिले. दरम्यान, त्यांनी वडिलांना पत्र लिहून सांगितले की, मला बंदूक हवी आहे, त्यासाठी 100 रुपये हवे आहेत. वडिलांनी प्रेम नाथ यांना 100 रुपये पाठवले आणि ते 100 रुपये घेऊन त्यांनी स्वप्नांची नगरी मुंबई गाठली.

पृथ्वीराज कपूर यांच्या विनंतीवरून पृथ्वी थिएटरमध्ये प्रवेश मिळाला

मुंबईत पोहोचल्यानंतर प्रेम नाथ थेट पृथ्वीराज कपूर यांना भेटायला गेले. दोघांची भेट झाली आणि प्रेम नाथ यांनी पृथ्वीराज कपूर यांना सांगितले की तुम्ही मला तुमचा शिष्य बनवा आणि पृथ्वी थिएटरचा एक भाग देखील बनवा. पृथ्वीराज कपूर त्यांच्या वागण्याने इतके प्रभावित झाले की त्यांनी प्रेम नाथ यांना पृथ्वी थिएटरमध्ये दाखल करून घेतले. तिथे त्यांची पृथ्वीराज कपूर यांचा मुलगा राज कपूर यांच्याशी मैत्री झाली. दोघांची मैत्री खूप घट्ट होती, पण पुढे ही मैत्री नात्यात बदलेल हे कोणालाच माहीत नव्हते.

पहिल्या रंगीत चित्रपटांपैकी एक 'अजीत'मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण

त्यानंतर 1948 मध्ये रिलीज झालेल्या 'अजीत' चित्रपटातून प्रेम नाथ यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. अजीत हा पहिल्या रंगीत चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटात मोनिका देसाई प्रेम नाथ यांच्यासोबत दिसल्या होत्या. पहिल्या चित्रपटानंतर, प्रेम नाथ राज कपूरच्या आग और बरसात या पहिल्या दिग्दर्शित चित्रपटात दिसले.

1953 मध्ये प्रेम नाथ यांचा औरत हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्यांच्या अपोझिट बीना राय यांनी भूमिका साकारली होत्या. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोन्ही स्टार्समध्ये जवळीक वाढली, त्यानंतर दोघांनी लग्न केले.

चित्रपट दिग्दर्शनातही हात अजमावला

चित्रपटांची पार्श्‍वभूमी आणि जाण असल्याने प्रेम नाथ यांनी बीना राय यांच्यासोबत P.N फिल्मस ही चित्रपट निर्मिती कंपनी सुरू केली. या बॅनरखाली अनेक चित्रपट प्रदर्शित झाले, परंतु बहुतेक फ्लॉप ठरले. यानंतर त्यांनी अभिनय कारकिर्दीवर पूर्ण लक्ष केंद्रित केले.

स्वतःच्या अपयशाने हताश होत काही वर्षे चित्रपटसृष्टीपासून अंतर

एकीकडे बीना राय यांना लग्नानंतर अनारकली, ताजमहाल, घोंगघाट यांसारख्या चित्रपटांतून प्रसिद्धी मिळत असताना दुसरीकडे प्रेम नाथ अपयशाचा सामना करत होते. परिस्थिती अशी होती की त्यांच्या घरी जे लग्न समारंभासाठीच्या निमंत्रण पत्रिकांवर मिस्टर अँड मिसेस राय लिहिलेले असायचे. बीना राय यांना कास्ट करण्याच्या हेतूनेच बहुतेक दिग्दर्शक त्यांच्या घरी जायचे. परंतु प्रेम नाथ यांना असे वाटायचे की त्यांनी त्यांच्यासाठी चित्रपटांच्या ऑफर आणल्या आहेत. त्यांच्या आयुष्याची कहाणी हुबेहुब अभिमान चित्रपटाच्या कथेसारखी झाली होती.

पत्नीच्या यशाचे त्यांना कसलेही दुःख नव्हते, मात्र स्वतःच्या अपयशाने त्यांना त्रास व्हायचा. या कारणास्तव त्यांनी काही वर्षे चित्रपटसृष्टीपासून स्वतःला दूर ठेवले होते. त्या काळात ते संन्याशासारखे जीवन जगत होते.

खलनायक म्हणून पुनरागमन केले

प्रदीर्घ काळ चित्रपटांपासून दूर राहिल्यानंतर प्रेम नाथ यांनी जॉनी मेरा नाम या चित्रपटाद्वारे पुनरागमन केले. नायकाच्या भूमिकेत ते हिट झाले नाही, तर त्यांनी खलनायकाच्या भूमिकेत चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. बॅक टू बॅक हिट चित्रपटांमध्ये दिसल्यानंतर, प्रेम नाथ सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत सामील झाले.

बॉबी चित्रपटासाठी मच्छिमारांसोबत राहून त्यांची जीवनपद्धती शिकून घेतली

बॉबी चित्रपटात प्रेम नाथ यांनी बॉबी बनलेल्या डिंपलच्या वडिलांची (जॅक ब्रेगांझांची) भूमिका साकारली होती. या व्यक्तिरेखेसाठी त्यांचे खूप कौतुक झाले. जॅक ब्रेगांझा हा मच्छीमार होता. ही भूमिका अधिक चांगल्या प्रकारे साकारण्यासाठी प्रेम नाथ काही दिवस मुंबईतील मच्छिमारांसोबत राहिले. त्यांना विश्वास होता की त्यांच्यासोबत राहिल्याने ते जॅक ब्रेगांझांचे पात्र अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतील.

दिलीप कुमार यांच्यासोबतच्या मैत्रीसाठी प्रेम नाथ यांनी मधुबालांना सोडले

प्रेम नाथ आणि मधुबाला यांनी बादल, आराम आणि साकी सारखे चित्रपट एकत्र केले. या चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली आणि दोघांना लग्न करायचे होते. रिपोर्ट्सनुसार, दोघेही एकमेकांना 6 महिने डेट करत होते.

मधुबालाने हिंदू धर्म स्वीकारावा आणि आपल्यासोबत लग्न करावे, अशी प्रेम नाथ यांची इच्छा होती. मधुबाला या मुस्लीम होत्या आणि पठाण कुटुंबातील होत्या. प्रेम नाथ यांचा हा प्रस्ताव मधुबालांना अजिबात पटला नाही, म्हणून दोघांनीही दुर होण्याचा निर्णय घेतला. मधुबालांपासून दूर गेल्यावरही प्रेम नाथ यांचे त्यांच्यावर खूप प्रेम होते. पण दरम्यान, दिलीप कुमार आणि मधुबालांच्या अफेअरचीही जोरदार चर्चा होती. दोघांनीही अनेक चित्रपट एकत्र केले.

मधुबाला आणि दिलीप कुमार यांच्यातील संबंध प्रेम नाथ यांना कळल्यावर त्यांनी पूर्णपणे माघार घेतली. खरे तर दिलीप कुमार आणि प्रेम नाथ दोघेही खूप चांगले मित्र होते. धर्माच्या नावाखाली त्यांनी मधुबालांना आधीच गमावले होते, त्यामुळे दिलीप साहेबांसोबतची मैत्री बिघडू नये असे त्यांना वाटत होते.

राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा यांचे भाऊ होते प्रेम नाथ

प्रेम नाथ आणि राज कपूर हे सुरुवातीपासून चांगले मित्र होते. प्रेम नाथ राज कपूर यांच्या अनेक चित्रपटांमध्येही दिसले होते. एकदा राज कपूर प्रेम नाथ यांच्यासोबत रीवा येथे गेले होते, जिथे राज कपूर यांना पहिल्या नजरेत कृष्णा आवडली आणि दोघांनी लग्न केले. तर प्रेम नाथ यांची दुसरी बहीण उमा हिचा विवाह अभिनेता प्रेम चोप्रांसोबत झाला होता.

हॉलीवूडमध्येही गेले

प्रेम नाथ यांनी केनरे या अमेरिकन चित्रपटातही काम केले होते. हा चित्रपट 1969 मध्ये प्रदर्शित झाला होता. याशिवाय त्यांनी 1967 ते 1969 या काळात अमेरिकन टीव्ही शो 'माया'मध्ये काम केले. 'हम दो' हा प्रेम नाथ यांचा शेवटचा हिंदी चित्रपट होता. प्रेम नाथ यांचे 1992 मध्ये वयाच्या 65 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

बातम्या आणखी आहेत...