आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राहुल रॉय हेल्थ अपडेट:ब्रेन स्ट्रोकमुळे शरीराच्या डाव्या बाजूवर परिणाम, मेहुणा म्हणाला - औषधांना सकारात्मक प्रतिसाद देत आहे

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ब्रेन स्ट्रोक आल्याने त्याला अफेजया नावाचा आजार झाला असल्याचे वृत्त आहे.

1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आशिकी' या चित्रपटातून आपल्या अभिनय करिअरला सुरुवात करणारा अभिनेता राहुल रॉयला ब्रेन स्ट्रोकचा झटका आला आहे. सध्या मुंबईतील नानावटी रुग्णालयातील आयसीयूत त्याच्यावर उपचार सुरु आहेत. ब्रेन स्ट्रोक आल्याने त्याला अफेजया नावाचा आजार झाला असल्याचे वृत्त आहे. या आजारामुळे तो कोणतेही वाक्य व्यवस्थित बोलू शकत नाहीये.

शस्त्रक्रिया करावी लागणार

मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयातील डॉक्टरांची टीम त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यावर विचार करत आहे. परंतु, शस्त्रक्रिया करणे त्याच्यासाठी अत्यंत धोकादायक मानले जाते आहे. त्यामुळे अद्याप त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

शरीराच्या डाव्या बाजूवर परिणाम
ई टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, नानावटी रुग्णालयातील डॉक्टरांचे म्हणणे आहे की, राहुल रॉयवर उपचार सुरु असून तो औषधांना प्रतिसाद देत आहेत. तसेच त्याचा वायटल पॅरामीटर सामान्य होत आहे. परंतु, यामुळे राहुलच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूवर परिणाम झाला आहे. तसेच एक हातही अशक्त झाला आहे. त्याची रिकव्हरी फार सावकाश होत आहे. त्याला नंतर फिजिओथेरपीच्या काही सेशन्सची गरज पडणार आहे.

बहीण घेतेय काळजी
राहुलची बहीण प्रियांका आणि तिचे पती रोमिर सेन त्याची काळजी घेत आहेत. रोमिर सेन यांनी राहुलच्या तब्बेतीबाबत सांगितले की, "आम्ही राहुलसोबत आहोत आणि डॉक्टर जे ट्रिटमेंट करत आहेत, त्याला तो सकारात्मक प्रतिसाद देत आहे. तो लवकरच ठीक होईल. परंतु त्याच्यासाठी प्रार्थना करा," असे सेन म्हणाले.

कारगिलमध्ये करत होता शूटिंग

52 वर्षीय राहुल कारगिलमध्ये आगामी LAC या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होता. परंतु चित्रीकरणादरम्यानच त्याची अचानक तब्येत बिघडली. त्यावेळी त्याला श्रीनगर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर मुंबईला उपचारासाठी हलवण्यात आले. 28-29 नोव्हेंबर दरम्यान, रात्री दीड वाजण्याच्या सुमारास मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

तीन दशकांपासून चित्रपटसृष्टीत कार्यरत

मागील तीन दशकांपासून चित्रपटसृष्टीत कार्यरत असलेल्या राहुलने 1990 च्या ‘आशिकी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते, या चित्रपटात अनु अग्रवालदेखील मुख्य भूमिकेत होती. त्यानंतर राहुल 'जुनून' (1992), 'फिर तेरी कहानी याद आइ' (1993), 'नसीब' (1997), 'एलान' (2011) आणि 'कॅबरे' (2019) सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. तो 'बिग बॉस'च्या पहिल्या सीझनचा (2007) विजेताही होता.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser