आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपकमिंग प्रोजेक्ट:आगामी 'स्ट्रोक' चित्रपटात स्ट्रोक विक्टिमच्या भूमिकेत दिसणार राहुल रॉय, अलीकडेच याच आजाराशी करावा लागला सामना

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राहुल रॉयला सोमवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

अभिनेता राहुल रॉयला अलीकडेच कारगिलमध्ये आपल्या आगामी 'एलएसी: लिव्ह द बॅटल' या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सेटवर ब्रेन स्ट्रोकचा झटका आला होता. आता राहुल या चित्रपटाचे दिग्दर्शक नितीन कुमार गुप्ता यांच्यासह एका नव्या चित्रपटात स्ट्रोक विक्टिमची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे शीर्षक 'स्ट्रोक' असेल. एका मुलाखतीत नितीन म्हणाले, राहुल सोमवारी आपल्या बहिणीसोबत रुग्णालयातून घरी गेला आहे. तिथे आता त्याची स्पीच थेरपी चालू राहिल. नितीन यांनी सांगितले की, राहुलसोबतचा त्यांचा पुढील चित्रपट ‘सैयोनी’ हा डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

फेब्रुवारीमध्ये 'स्ट्रोक'च्या चित्रीकरणाला करणार सुरुवात
'सैयोनी' हा राहुलला आलेल्या ब्रेन स्ट्रोकनंतर रिलीज होणारा पहिला चित्रपट असेल, असे नितीन यांनी सांगितले. इतर निर्माते आता त्याच्याबरोबर काम करण्यास पुढे येत नाहीये. मी त्याच्याबरोबर फेब्रुवारीमध्ये एक फिल्म लाँच करण्याची योजना आखत आहे. हा चित्रपट एका हत्येच्या गूढवर आधारित असेल. ज्याचे शीर्षक 'स्ट्रोक' असेल. योगायोग म्हणजे, राहुलने साकारलेल्या या चित्रपटाचा नायक एका हत्येचा साक्षीदार असतो. पण त्याला मारेक-याचे नाव सांगता येत नाही. कारण त्याला ब्रेन स्ट्रोक झालेला असतो.

लवकरच बरा होऊन परतेल
या आठवड्याच्या सुरुवातीस राहुल रॉयने सोशल मीडियावर आपल्या प्रकृतीविषयी एक अपडेट दिला होता. हॉस्पिटलमधून आपली बहीण पिया ग्रेस रॉय आणि भाऊ रोहित यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करताना त्याने लिहिले होते, 'कुटुंबाचे प्रेम. बरा होतोय. नानावटी हॉस्पिटलमधून एक फोटो, लवकरच परत येईल. तुम्हा सर्वांना माझे खूप प्रेम', असे कॅप्शन त्याने दिले होते.

फोटो व्यतिरिक्त राहुलने आपली बहीण आणि भावासोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्यामध्ये तो आपल्या बहिणीच्या मदतीने उभा झालेला दिसतोय. व्हिडिओसह राहुलने लिहिले, मी बरा होतोय. माझ्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल आणि मला भरपूर प्रेम दिल्याबद्दल माझ्या सर्व मित्र, कुटुंबीय आणि चाहत्यांचे खूप खूप आभार. लवकरच मी परतेल.

कारगिलमध्ये शूटिंगदरम्यान आला होता ब्रेन स्ट्रोकचा झटका
52 वर्षीय राहुल रॉयच्या मेंदूच्या डाव्या भागात रक्ताच्या गुठळ्या झाल्या होत्या. कारगिलमध्ये LAC : Live the Battle चित्रपटाचे शूटिंग करताना राहुल रॉयला ब्रेन स्ट्रोकची झटका आला होता. त्यावेळी त्याला श्रीनगर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर मुंबईला उपचारासाठी हलवण्यात आले. 28-29 नोव्हेंबर दरम्यान, रात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्याला मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. राहुलची प्रकृती गंभीर झाल्याने सुरुवातीला त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार करण्यात आले. राहुल रॉयला प्रोगेसिव्ह ब्रेन स्ट्रोक आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. कारगिलमध्ये सध्या प्रचंड थंडी असून तापमान उणे अंशांमध्ये आहे. त्यामुळे राहुल रॉयला मेंदूघाताचा झटका आल्याचा अंदाज वर्तवला गेला होता.

राहुलच्या आगामी LAC या चित्रपटाविषयी सांगायचे म्हणजे हा चित्रपट लडाखमधील गलवान व्हॅलीत भारत आणि चीन या दोन देशातील सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीवर आधारित आहे. नितीन कुमार गुप्ता याचे दिग्दर्शक आहेत. तर चित्रा वकील शर्मा आणि निवेदिता बासू यांची ही निर्मिती आहे. या चित्रपटात बिग बॉस 14 चा स्पर्धक निशांत मलकानी मुख्य भूमिकेत आहे.

तीन दशकांपासून चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे राहुल
मागील तीन दशकांपासून चित्रपटसृष्टीत कार्यरत असलेल्या राहुलने 1990 च्या ‘आशिकी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते, या चित्रपटात अनु अग्रवालदेखील मुख्य भूमिकेत होती. त्यानंतर राहुल 'जुनून' (1992), 'फिर तेरी कहानी याद आइ' (1993), 'नसीब' (1997), 'एलान' (2011) आणि 'कॅबरे' (2019) सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. तो 'बिग बॉस'च्या पहिल्या सीझनचा (2007) विजेताही होता.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser