आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडचणीत अभिनेता:रजत बेदीच्या कारच्या धडकेत जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू, अभिनेत्याला अटक होण्याची शक्यता

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेता रजत बेदीच्या अडचणी वाढल्या असून त्याला अटक होण्याची शक्यता आहे.

बॉलिवूड अभिनेता रजत बेदीच्या गाडीने एका व्यक्तीला धडक दिल्याची घटना सोमवारी घडली होती. या अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीचा मंगळवारी कूपर रुग्णालयात उपचारावेळी मृत्यू झाला आहे. राजेश धूत असे मृत्य व्यक्तीचे नाव आहे. राजेश धूत याचा मृत्यूनंतर आता अभिनेता रजत बेदीच्या अडचणी वाढल्या असून त्याला अटक होण्याची शक्यता आहे.

या अपघातात व्यक्तीच्या डोक्याला दुखापत झाली होती. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.
या अपघातात व्यक्तीच्या डोक्याला दुखापत झाली होती. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
अभिनेता रजत बेदी सोमवारी संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास अंधेरी येथील डी.एन नगर परिसरातून गाडीने जात होता. त्यावेळी त्याच्या गाडीसमोर राजेश धूत आला आणि हा अपघात झाला. या अपघातामध्ये राजेश धूत गंभीर जखमी झाला होता. रजत बेदीने प्रसंगावधान राखत जखमी राजेशला तातडीने कूपर रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याच्यावर उपचार सुरू होते. रजत बेदीने कबूल केले
होते की, तो माणूस त्याच्या कारनेच जखमी झाला होता.

रजत बेदीवर गुन्हा दाखल

पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच या प्रकरणी रजत बेदीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीएन नगर पोलिस ठाण्यात आपीसी धारा 279 आणि 338 अंतर्गंत गुन्हा दाखल झाला आहे. आता अपघातामधील जखमी व्यक्तीचा मृत्यू झाल्याने रजत बेदीला अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दारुच्या नशेत होता राजेश धूत
रजत बेदीने पोलिसांना सांगितले आहे की, जखमी झालेली व्यक्ती नशेत होती आणि चुकून त्याच्या कारसमोर आली. तो काम करुन घरी परतत होता आणि रस्ता ओलांडताना अपघाताचा बळी ठरला.
कारला धडक दिल्यानंतर त्याच्या डोक्याला कंबरेला दुखापत झाली होती. रजतने त्याच्या उपचारांचा संपूर्ण खर्च उचलण्याचे आश्वासन दिले होते.

पत्नीनेही राजेश धूत नशेत असल्याची दिली होती कबुली
पीडितेच्या पत्नीने देखील कबूल केले होते की, अपघात झाला तेव्हा तिचा पती नशेत होता. ती म्हणाली होती, 'माझे पती संध्याकाळी 6.30 वाजता घरी परतत असताना हा अपघात झाला. रजत बेदी, जो
कार चालवत होता (एमएच 02 सीडी 4809) त्याने माझ्या पतीला धडक दिली होती.'

रजत बेदीची कारकीर्द
रजत बेदीने मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात केली. त्याने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 1998 साली '2001' या हिंदी चित्रपटापासून केली. या चित्रपटात जॅकी श्रॉफ, डिंपल कपाडिया आणि तब्बू मुख्य भूमिकेत होते. रजत बेदी यांनी अभिनेता म्हणून नव्हे तर खलनायक म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत छाप पाडली आहे, ज्याचे प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी देखील खूप कौतुक केले. याशिवाय, रजत 'कोई मिल गया', 'इंटरनॅशनल खिलाडी' सारख्या चित्रपटांचाही भाग राहिला आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून तो चित्रपटांपासून दूर आहे. रजत बेदी सध्या परदेशात आपला व्यवसाय करत आहे.

बातम्या आणखी आहेत...