आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणबीरला कोरोनाची लागण?:रणबीर कपूरची प्रकृती बिघडली, काका रणधीर म्हणाले - त्याला नेमके काय झाले ठाऊक नाही, पण कोविड पॉझिटिव्ह असण्याची शक्यता आहे

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रणबीरला सध्या अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

अभिनेता रणबीर कपूरची प्रकृती बिघडल्याचे वृत्त आहे. रणबीरचे काका रणधीर कपूर यांनी या वृत्ताला दुजोरा दिले आहे. मात्र रणबीरला नेमके काय झाले आहे, याबाबत त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले नाही. कदाचित रणबीरला कोरोनाची लागण झाली असावी, असे त्यांनी म्हटले आहे. वृत्तानुसार, रणबीरने कोरोनाची चाचणी करुन घेतली होती. त्यात त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कळते आहे. एका न्यूज वेबसाइटच्या रिपोर्टनुसार रणबीरला सध्या अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

'मला नेमके माहित नाही' - रणधीर कपूर
न्यूज वेबसाईटने जेव्हा यासंदर्भात रणबीरचे काका रणधीर कपूर यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा त्यांनी सुरुवातीला हो म्हटले आणि मग ते म्हणाले की, ‘रणबीरची तब्येत ठीक नाही, पण त्याला कोरोना झालाय की नाही, हे माहित नाही. मी सध्या शहराबाहेर आहे.’

काही महिन्यांपूर्वी रणबीरची आई आणि अभिनेत्री नीतू कपूर यांना जुग जुग जियो या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान कोरोनाची लागण झाली होती. त्यांचा को-स्टार वरुण धवन याचाही कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. नीतू आणि वरुण यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना ही बातमी दिली होती.

'ब्रह्मास्त्र' आणि 'अ‍ॅनिमल'मध्ये झळकणार रणबीर
रणबीरच्या व्यावसायिक आयुष्याविषयी बोलायचे तर, तो ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्यासोबत झळकणार आहेत. याशिवाय तो ‘अ‍ॅनिमल’मध्येही दिसणार आहे, त्यात त्याच्यासोबत परिणीती चोप्रा, बॉबी कपूर आणि अनिल कपूर आहेत. याशिवाय दिग्दर्शक लव्ह रंजनच्या अद्याप शीर्षक न ठरलेल्या चित्रपटातही रणबीर झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासह श्रद्धा कपूर दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...