आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रद्धांजली:तेरावीच्या दिवशी मुलगी रिद्धिमाने केले वडिलांचे स्मरण, प्रार्थना सभेत रणबीरसोबत पोहोचली आलिया भट, श्वेता बच्चनचीही उपस्थिती 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रणबीर वगळता सगळ्यांनी चेह-यावर मास्क लावला होता.

 ऋषी कपूर यांच्या तेरावी निमित्त मुंबईतील त्यांच्या घरी प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. त्यांची मुलगी रिद्धिमा कपूर साहनीने प्रार्थना सभेची काही छायाचित्रे इंस्टाग्रामवर शेअर केली आहेत. एका छायाचित्रात ऋषी कपूर यांच्या फोटवर हार चढवण्यात आलेला दिसतोय. हे छायाचित्र शेअर करुन रिद्धिमाने लिहिले, 'तुमच्यावर कायम प्रेम करु पापा...' दुसर्‍या चित्रात रिद्धिमा आणि रणबीर पूजा करताना दिसत आहेत. रिद्धिमाने या छायाचित्राच्या कॅप्शनमध्ये लिहिले, “आपला वारसा कायम राहील. तुमच्यावर खूप प्रेम आहे.''

View this post on Instagram

Love you always Papa ...

A post shared by Riddhima Kapoor Sahni (RKS) (@riddhimakapoorsahniofficial) on May 12, 2020 at 5:24am PDT

View this post on Instagram

Your legacy will live on forever ... We love you 🙏🏻❤️

A post shared by Riddhima Kapoor Sahni (RKS) (@riddhimakapoorsahniofficial) on May 12, 2020 at 6:18am PDT

तेरावीच्या कार्यक्रमात कुटुंबातील सदस्य पोहोचले 

करिश्मा कपूर, श्वेता बच्चन नंदा आणि तिची मुलगी नव्या नवेली नंदा, रणधीर कपूर आणि त्यांची पत्नी बबीता कपूर, अरमान जैन आणि त्याची पत्नी अनिषा मल्होत्रा, रीमा जैन आणि तिचा मुलगा आदर जैन, आलिया भट यांनी तेरावीच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावून ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली. रणबीर वगळता सगळ्यांनी चेह-यावर मास्क लावला होता.  

रणबीर कपूरसोबत आलिया भट
रणबीर कपूरसोबत आलिया भट
करिश्मा कपूर
करिश्मा कपूर
नीतू कपूर
नीतू कपूर
मुलगी नव्यासोबत श्वेता बच्चन नंदा
मुलगी नव्यासोबत श्वेता बच्चन नंदा

30 एप्रिल रोजी झाले निधन

ऋषी कपूर यांचे 30 एप्रिल रोजी सकाळी मुंबईतील एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. ऋषी गेल्या दीड वर्षांपासून ल्युकेमिया (रक्ताचा कर्करोग) या आजाराशी झगडत होते. लॉकडाऊनमुळे त्यांच्या अंत्यसंस्कारात केवळ 20 लोक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...