आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाच्या विळख्यात सेलिब्रिटी:रणवीर शौरीला कोरोनाची लागण, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाला - मी क्वारंटाइन झालो आहे

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रणवीर शौरी 'मेट्रो पार्क 2' मध्ये दिसणार आहे.

अभिनेता रणवीर शौरीला कोरोनाची लागण झाली आहे. याची माहिती स्वतः रणवीरने बुधवारी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन दिली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर रणवीरने स्वतःला क्वारंटाइन केले आहे.

रणवीरने पोस्ट शेअर करताना लिहिले की, “मला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. माझ्यात सौम्य लक्षणे आहेत. त्यामुळे मी क्वारंटाइन झालो आहे.”

यापूर्वी बर्‍याच सेलिब्रिटींना झाली होती कोरोनाची लागण

रणवीरपूर्वी बॉलिवूडचे अनेक स्टार्स कोरोनाच्या विळख्यात सापडले होते. अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन यांच्यासह कनिका कपूर, मोरानी कुटुंब, नीतू कपूर, अर्जुन कपूर-मलायका अरोरा, वरुण धवन, कृती सेनन, रकुलप्रीत सिंग, तमन्ना भाटिया, तनाज करीम, हर्षवर्धन राणे यासारखे अनेक सेलिब्रिटींची कोविड 19 ची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. या सर्वांनी कोरोनावर यशस्वी मात केली.

रणवीर शौरी 'मेट्रो पार्क 2' मध्ये दिसणार आहे.
रणवीर शौरीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे म्हणजे, तो लवकरच 'मेट्रो पार्क 2' मध्ये दिसणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर अलीकडेच रिलीज झालेल्या 'लूटकेस' या चित्रपटात तो झळकला होता. याशिवाय ‘अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटातही तो झळकला होता. चित्रपटांव्यतिरिक्त रणवीर वेब सीरिजमध्येही अ‍ॅक्टिव आहे. तो 'रंगबाज', 'मेट्रो पार्क' यासारख्या वेब सीरिजमध्ये झळकला. 'रंगबाज'मधील त्याच्या व्यक्तिरेखेची बरीच चर्चा झाली होती. यात त्याने एटीएस प्रमुख सिद्धार्थ पांडेची भूमिका वठवली होती.

बातम्या आणखी आहेत...