आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहान अभिनेते रहमान यांची आज 101 वी जयंती आहे. 'प्यार की जीत', 'बडी बहन', 'परदेस', 'प्यासा' यांसारख्या चित्रपटांसाठी त्यांना ओळखले जाते. 1940 ते 1970 पर्यंत रहमान यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या चेहऱ्यावरील निरागसता आणि आवाजाचे लोक वेडे झाले होते.
रहमानेहा पाकिस्तानच्या रॉयल पश्तून कुटुंबातील आणि उच्च शिक्षित होते. रहमान यांना भारतीय हवाई दलात नोकरी मिळाली पण अभिनयाच्या आवडीमुळे ते ती नोकरी सोडून मुंबईत आले आणि अभिनेता झाले. त्यांना त्यांचा पहिला चित्रपट मिळण्याची कथाही खूप रंजक आहे. खरं तर, एक दिवस दिग्दर्शक पश्तूनी पगडी बांधू शकेल अशा व्यक्तीच्या शोधात होते. रहमान हे पश्तून होते त्यामुळे त्यांना त्यांचा फायदा झाला. मग काय रहमान यांनी पगडी बांधल्याबरोबर पहिली भूमिका मिळाली आणि याचबरोबर त्यांच्या करिअरला सुरुवात झाली. आज जाणून घेऊया त्यांच्या बॉलिवूड प्रवासाबद्दल बरंच काही -
राजघराण्यात जन्म
भारता ब्रिटीशांचे राज्य असताना 23 जून 1921 रोजी एका शाही पश्तून कुटुंबात रहमान यांचा जन्म झाला होता. लाहोरमध्ये जन्मलेले रहमान देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतात स्थायिक झाले. तो सुरुवातीपासून अभ्यासात खूप हुशार होता, त्यामुळे जबलपूरच्या रॉबर्टसन कॉलेजमधून शिक्षण घेतल्यानंतर भारतीय वायुसेनेचे प्रशिक्षण घेऊन ते फोर्समध्ये दाखल झाले. इकडे रहमान यांना पायलटची नोकरीही मिळाली.
हवाई दल सोडले आणि अभिनयासाठी मुंबईत दाखल झाले
रहमान यांचे हवाई दलात मन लागत नव्हते. त्यांची उंची आणि भारदस्त आवाज यामुळे त्यांना अभिनयातच करिअर करावे असे वाटू लागले. मग काय, रहमान यांनी हवाई दलाची नोकरी सोडली आणि मुंबईत आले. इथे आल्यावर त्यांनी दिग्दर्शक व लेखक विश्राम बेडेकर यांच्यासोबत थर्ड असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करायला सुरुवात केली.
पश्तूनी पगडी बांधल्याने मिळाला पहिला चित्रपट
रहमान यांना पहिला चित्रपट मिळाल्याची कहाणीही खूप रंजक आहे. खरंतर एके दिवशी विश्राम बेडेकर त्यांच्या चित्रपटासाठी पश्तूनी पगडी बांधणा-या व्यक्तीच्या शोधात होते आणि रहमान मुळ पश्तून. वरवर पाहता त्यांना पश्तूनी पगडी कशी बांधायची हे देखील माहित होते. मग काय होतं, रहमान दिसायला तर देखणे होतेच, पण त्यांचा आवाजही खूप भारदस्त होता. अशाप्रकारे त्यांना पहिला चित्रपट मिळाला.
गुरु दत्त यांच्या टीमध्ये सामील झाले
दरम्यानच रहमान यांची भेट गुरु दत्त यांच्याशी झाली. ते गुरु दत्त यांच्या टीमशी जुळले गेले आणि त्यानंतर त्यांनी अनेक उत्तम चित्रपट केले. यामध्ये 1948 मधील प्यार की जीत, 1949 मधील बडी बहन, 1950 मधील परदेस, 1960 मधील चौधवी का चांद, 1962 मधील साहिब बीबी और गुलाम यांसारख्या उत्कृष्ट चित्रपटांचा समावेश आहे.
सुरैयाशी करायचे होते लग्न
रहमान यांचे प्रमुख अभिनेता म्हणून 'प्यार की जीत' आणि 'बडी बहन' हे चित्रपट खूप गाजले. या दोन्ही चित्रपटांमध्ये रहमान अभिनेत्री सुरैयासोबत दिसले होते. अशा परिस्थितीत शूटिंगदरम्यान रहमान सुरैयाच्या प्रेमात पडले. रहमानयांना सुरैयाशी लग्न करायचे होते, पण सुरैया आधीच देव आनंद यांच्या प्रेमात आकंठ बुडाल्या होत्या. त्यामुळे रहमान यांना सुरैयाशी लग्न करता आले नाही. सुरैयासोबतच्या त्यांच्या 'प्यार की जीत' या चित्रपटातील त्यांचे "एक दिल के तुकड़े हजार हुए, एक यहां गिरा एक वहां गिरा" हे गाणे अजरामर झाले. रहमान यांनी नंतर मधुबालासोबत पारस आणि परदेस या चित्रपटात काम केले. दोन्ही चित्रपट हिट ठरले.
पाकिस्तानी चित्रपटांमध्ये कुटुंबीय सक्रीय पण रहमान यांना भारत आवडला
फाळणीनंतर रहमान यांच्या कुटुंबातील बहुतेक सदस्य पाकिस्तानात राहिले पण रहमान आपल्या कुटुंबासह भारतात आले. त्यांचा पुतण्या फैजल रहमान हा पाकिस्तानमधील उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे. त्यांचा दुसरा पुतण्या फसीह उर रहमान हा पाकिस्तानमधील क्लासिकल डान्सर आहे. कर त्यांचा भाचा मासूद उर रहमान हा पाकिस्तानचा प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर आहे.
कर्करोगामुळे गमवावा लागला होता आवाज
रहमान त्यांच्या भारदस्त आवाजासाठी ओळखले जात होते. 1977 पर्यंत, त्यांना 3 वेळा हृदयविकाराचे झटके आले, परंतु तरीही त्यांचा आत्मविश्वास ढासळू दिला नाही, पण अखेर कर्करोगाने ते कोलमडले होते. खरंतर रहमान यांना दारूचे व्यसन होते, त्यामुळे त्यांना घशाचा कर्करोग झाला आणि त्यांना त्यांचा जादुई आवाज गमावावा लागला. रहमान यांनी दीर्घ काळ या आजाराशी झुंज दिली, अखेर 1984 मध्ये त्यांनी कायमचा या जगाचा निरोप घेतला. पण शेवटच्या क्षणी त्यांच्या तोंडातून एक शब्दही निघाला नाही ही खंत कायम राहिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.