आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाद:अभिनेते ऋषी कपूर यांच्या शेवटच्या क्षणांचा व्हिडिओ झाला व्हायरल, सर एच.एन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल प्रशासनाला बजावली नोटीस

मुंबई3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा या हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागातील आहे.

बॉलिूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी 30 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. बुधवारी म्हणजे 29 एप्रिल रोजी त्यांना छातीत संसर्ग, श्वास घेण्यात त्रास आणि सौम्य ताप यामुळे मुंबईतील सर एच.एन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर त्यांचा हॉस्पिटलमधील शेवटच्या क्षणांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. 

याप्रकरणी ‘द फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’ (FWICE) कडून सर  एच.एन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलविरोधात तक्रार दाखल करण्यात आली  असून नोटीसही बजावण्यात आली आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा या हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागातील आहे. यात ऋषी कपूर हे बेडवर झोपले असून यांना श्वासोच्छवास घेण्यास अडचण येत असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या निधनानंतर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला, त्यामुळे FWICE त्यावर आक्षेप नोंदविला आहे. 

FWICE चे अध्यक्ष अशोक पंडित यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत या व्हिडिओवर आक्षेप घेतला आहे.  फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइसने (FWICE) या व्हिडिओला अनैतिक ठरवत एका गौरवशाली व सन्मानपूर्ण जीवन जगणाऱ्या व्यक्तीच्या अधिकारांचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.  हा व्हिडिओ अनैतिक आहे. कोणतीही परवानगी न घेतला हा व्हिडिओ काढण्यात आला आहे, असे अशोक पंडित यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

या तक्रारीनंतर हॉस्पिटल प्रशासनाकडून निवेदन देण्यात आले आहे. हॉस्पिटलच्या अधिकृत फेसबुक पेजवरील एका पोस्टमध्ये लिहिले आहे, 'सर एच.एन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाचा एक संदेश. आम्हाला माहिती मिळाली आहे की आमच्या एका रूग्णाचा व्हिडिओ डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे. सर एच.एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमधील रुग्णांची गोपनीयता आमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि आम्ही अशा कृतींचा तीव्र निषेध करतो. रुग्णालय व्यवस्थापन या घटनेचा तपास करीत असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल.'

बातम्या आणखी आहेत...